agriculture news in marathi, 13thousand liter pesticide under stopsale, Aurangabad | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात १३००० लिटर कीटकनाशक विक्री बंद
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद : कृषी विभागाच्या वतीने आजवर औरंगाबाद जिल्ह्यातील १९८ कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १३ हजार लिटर/किलो कीटकनाशकांवर विक्री बंदीचे आदेश देण्यात आले असून, ६६ कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. 

औरंगाबाद : कृषी विभागाच्या वतीने आजवर औरंगाबाद जिल्ह्यातील १९८ कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १३ हजार लिटर/किलो कीटकनाशकांवर विक्री बंदीचे आदेश देण्यात आले असून, ६६ कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करणाऱ्या व्यक्‍तींचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तपासणी सुरू झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी विभागाच्या वतीने जवळपास १९८ कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली, अजूनही तपासणीचे काम सुरू आहे. या तपासणीदरम्यान विविध कारणांवरून जिल्ह्यातील ६६ कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. काहींना त्यांच्याकडे आढळलेल्या त्रुटींसाठी विहित मुदतीत त्याविषयीचा पुरावा सादर करण्याची संधीही देण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान १३ हजार लिटर/किलो कीटकनाशकांवर विविध कारणांवरून विक्री बंदीचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

बिगरनोंदणीकृत प्रॉडक्‍ट हद्दपार
यवतमाळच्या घटनेनंतर शासनाच्या वतीने काही अपेक्षित बाबींच्या अनुषंगाने शासन आदेश निर्गमित करण्यात आला. त्याला अनुसरून कृषी विभागाच्या वतीने असे प्रॉडक्‍ट आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्र निर्गमित करण्यात आले. या पत्रामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील यंत्रणेच्या माध्यमातून कृषी सेवा केंद्रांना बिगरनोंदणीकृत प्रॉडक्‍टविषयी सजग करण्यात आले. परिणाम स्वरूप जिल्ह्यातील सर्वच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बिगरनोंदणीकृत प्रॉडक्‍ट जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली. 

ग्रामसभांच्या माध्यमातून जागर
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमधून ग्रामसभांच्या माध्यमातून कीटकनाशकांचा वापर, घ्यावयाची काळजी या प्राधान्याच्या विषयासह इतर शेतीविषयक प्रश्नांवर शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. नॉन बीटी लागवड करणे, फरदड न घेणे, कीटकनाकाशके फवारताना घ्यावयाची आदर्श काळजी, आदी ठराव या अनुषंगाने घेण्यात आले. दोषी आढळणाऱ्यांवर कारावाईसोबतच यवतमाळसारखे प्रकार आपल्याकडे घडू नये यासाठी प्रत्येक ग्रामसभेतून फवारणीची कामे सतत करणाऱ्या शेतकरी व मजुरांची माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांचे प्रबोधन व प्रशिक्षणाचा मानस असून फवारणीची गरज, केवळ व्यावहारिक नफ्याचा उद्देश ठेवून कृषी निविष्ठांची विक्री होता कामा नये, यासाठी यंत्रणा व कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या समन्वयातून काम सुरू असल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. 

इतर बातम्या
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
दुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन...पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
सांगली जिल्ह्यात १४ हजार शेतकरी वीज...सांगली : जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक शेतकरी वीज...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
अकोला जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना...अकोला : दुष्काळमुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यात...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
रब्बीची ज्वारीची एक लाख हेक्टरवर पेरणीसातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामात अन्नधान्यासह...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
पूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...