agriculture news in Marathi, 14 thousand cost of every farm school, Maharashtra | Agrowon

प्रत्येक शेतीशाळेवर १४ हजार खर्च; थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

पुणे : शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन जादा पीक उत्पादनाची माहिती देणाऱ्या शेतीशाळांना राज्यभर धडाक्यात सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक शेतीशाळेवर १४ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

पुणे : शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन जादा पीक उत्पादनाची माहिती देणाऱ्या शेतीशाळांना राज्यभर धडाक्यात सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक शेतीशाळेवर १४ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

शेतीशाळेसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, गळीत धान्य अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि आत्मामधून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानंतरदेखील निधी कमी पडल्यास क्रॉपसॅपमधून निधी मिळणार आहे. क्रॉपसॅप संलग्न शेतीशाळेसाठी प्रशिक्षण साहित्याकरिता प्रतिशेतकरी दोनशे रुपये या प्रमाणे पाच हजारांपर्यंत खर्च केला जाईल. शेतकरी अल्पोपहारासाठी पाच हजारांपर्यंत, शेतकरीदिनासाठी दोन हजार तर अहवाल तयार करण्यासाठी दोन हजार रुपये असे एकूण १४ हजार रुपये एका शाळेवर खर्च केले जातील. 

राज्यात सोयाबीनच्या ६३३ शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत. आत्मामधून मात्र दोन हजार २०० शेतीशाळा होतील. त्यासाठी तीन कोटी रुपयांच्या आसपास खर्च होण्याची शक्यता आहे. नाशिक विभागात २५०, पुणे २३४, कोल्हापूर २१३, औरंगाबाद १७८, लातूर ३०५, अमरावती ३३६ तर नागपूर विभागात सर्वात जास्त म्हणजे ४०६ शेतीशाळा आत्मामधून घेतल्या जाणार आहेत. 

कृषी सहायकाकडून क्रॉपसॅपमध्ये निवडलेल्या गावांमध्ये एका प्रमुख पिकासाठी निवडलेल्या प्लॉटवर शेतीशाळा घेतली जाईल. महिला कर्मचाऱ्यांना मात्र जास्तीत जास्त महिला शेतकरी वर्गाला प्राधान्य देत महिला शेतीशाळा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

एमक्रॉपसॅप किंवा इतर ॲप्लिकेशनद्वारे शेतीशाळा प्रशिक्षण वर्गाचे प्रत्यक्ष ठिकाण, वेळ व अहवालाची नोंदणी केली जाणार आहे. कृषी सहायक व पर्यवेक्षकांवर ही जबाबदारी असेल. मंडळ कृषी अधिकाऱ्यांना या शेतीशाळांमध्ये मार्गदर्शन करावे लागेल. याशिवाय त्यांना एमक्रॉपसॅपमध्ये शेतीशाळेला भेट दिल्याच्या प्रत्यक्ष ठिकाणाचा फोटो, वेळ, अहवाल नोंदणी करावी लागणार आहे. 

१५ दिवसांनी प्रशिक्षण वर्ग
प्रमुख पिकाची निवड करताना खरीप हंगामात एकूण पेरणी होणाऱ्या क्षेत्रापैकी ७० टक्के पेरा होणाऱ्या पिकाला प्राधान्य मिळणार आहे. पीकवाढीच्या अवस्थेनुसार दर १५ दिवासांनी प्रशिक्षण वर्ग होतील. शेतीशाळेत किमान २५ शेतकरी ठेवले जातील. या शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांचा तसेच केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ देतांना प्राधान्य मिळणार आहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोरः...पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाचा...
खत आयातीत हेराफेरीपुणे : शेतकऱ्यांना पुरवठा करण्याच्या नावाखाली...
शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला; पण पीकविमा...सोलापूर ः पीकविम्याच्या विषयावर सातत्याने...
मराठवाड्यातील उद्ध्वस्त बागा...औरंगाबाद ः सततच्या दुष्काळानं मराठवाड्यातील...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...
आयात खाद्यतेलावर १० टक्के विकासकर लावाः...लातूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर...
कापसावरील टोळधाडीने पाकिस्तान धास्तावलासिंध, पाकिस्तान:  पाकिस्थानातील कापूस पीक...
बहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या...चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत...
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...