agriculture news in marathi, 14 thousand quintals of soyabean Purchase in Satara | Agrowon

साताऱ्यात १४ हजार क्विंटल सोयाबीनची आवक
टीम अॅग्रोवन
रविवार, 31 डिसेंबर 2017

सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळावी यासाठी जिल्हा मार्केटिंग विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सोयाबीनसाठी सुरू केलेल्या चार केंद्रांवर १४ हजार १७ क्विंटल आवक झाली असल्याची माहिती या विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळावी यासाठी जिल्हा मार्केटिंग विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सोयाबीनसाठी सुरू केलेल्या चार केंद्रांवर १४ हजार १७ क्विंटल आवक झाली असल्याची माहिती या विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन कमी दरात व्यापाऱ्याकडून मागणी होऊ लागल्याने सोयाबीनला आधारभूत किंमत मिळावी यासाठी प्रथमच जिल्हा मार्केटिंग विभागाकडून सोयाबीन खरेदीसाठी सातारा, कऱ्हाड, कोरेगाव व वाई अशी चार केंद्रे सुरू केली होती. कोरेगाव केंद्रास सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. या केंद्रावर सात हजार ९६ क्विंटल आवक झाली आहे. तर सातारा केंद्रावर तीन हजार ४७०, वाई केंद्रावर दोन हजार ३४ व कऱ्हाड केंद्रावर १ हजार ४१६ क्विंटल आवक झाली आहे.

जिल्ह्यातील सोयबीनची झालेली लागवड व इतर जिल्ह्याच्या तुलनेत खरेदी केंद्रावर सोयाबीनची आवक कमी दिसत असली तरी पहिलीच वेळ असतानाही प्रतिसाद चांगला मिळाला असल्याचे दिसत आहे. या केंद्रामुळे सोयाबीन खरेदीदार व्यापाऱ्यावर दबाव वाढल्याने दरातही वाढ होण्यास मदत झाली आहे. सध्या खासगी व्यापाऱ्याकडून आधारभूत किमतीच्या दरम्यान दर दिले जात असल्याने खरेदी केंद्रावर सोयाबीनची आवक कमी झाली आहे.

वडूज, दहीवडी व फलटण या तीन केंद्रावर मुगाची २०४ क्विंटल, उदीडाची दोन हजार ५७७, मक्‍याची सात हजार ४८ क्विंटल आवक झाली आहे. मूग व उडदाची नोंदणी खरेदी पूर्ण झाली असून मक्‍याची खरेदी ३१ डिसेंबरअखेर सुरू आहे. नोंदणी झालेली मक्‍याची खरेदी पूर्ण करणार असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले आहे.

फलटण येथे तूर पिकांचे खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. केंद्रावर येणाऱ्या तुरीला आधारभूत किंमत ५,४५० रुपये क्विंटला दर दिला जाणार आहे. खरेदी केंद्रावर जानेवारी महिन्याच्या सुरवातीपासून नोंदणी सुरू केली जाणार आहे.
- ए. एस. देसाई, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, सातारा

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...