agriculture news in marathi, 14,000 hectares farm damages in Washim district, becouse of heavy rain | Agrowon

वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टीने १४ हजार हेक्‍टरचे नुकसान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018
 वाशीम : जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून दरम्यानच्या काळात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मानोरा, कारंजा या तालुक्‍यांना जोरदार बसला आहे. जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १४ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणची जमीनही खरडून गेली आहे. संततधार पाऊस कायम असल्याने नुकसानीची आकडेवारी अंतिम होण्यात अडथळे निर्माण झालेले आहेत.
 
 वाशीम : जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून दरम्यानच्या काळात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मानोरा, कारंजा या तालुक्‍यांना जोरदार बसला आहे. जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १४ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणची जमीनही खरडून गेली आहे. संततधार पाऊस कायम असल्याने नुकसानीची आकडेवारी अंतिम होण्यात अडथळे निर्माण झालेले आहेत.
 
सोळा ते १८ ऑगस्टदरम्यान ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले. पुराचे पाणी शेतांमधून वाहले. सखल भागातील शेतांमध्ये अद्यापही पाणी असल्याने पिकांचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटाचा प्राथमिक आढावा यंत्रणांकडून घेतला जात आहे. यानुसार एकट्या मानोरा तालुक्‍यात सुमारे नऊ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्राला पावसाचा, पाण्याचा फटका बसला आहे. कारंजा तालुक्‍यात पाच हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
वाशीम जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद ही पिके कुठे फुलोर तर कुठे शेंगा परिपक्व होण्याच्या स्थितीत आहेत. अनेकांचे मुगाचे पीक काढणीला आले आहे. पावसामुळे शेंगामधून कोंब बाहेर येण्याची भीती निर्माण झालेली आहे. गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांकडून माहितीची जुळवाजुळव करून प्राथमिक अहवाल बनविण्यात आला. यानुसार या दोन तालुक्‍यांत सुमारे १४ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आलेले आहे.

घरांची पडझड
पावसामुळे फटका घरांनाही बसला. जिल्ह्यात या आठवडाभरात सुमारे ३०० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले. मानोरा, कारंजा, मालेगाव या तालुक्‍यांमध्ये घरांची पडझड झाली. मानोरा तालुक्यात ५० पेक्षा अधिक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज तहसील प्रशासनाने व्यक्त केला आहे.

इतर बातम्या
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...
धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
वनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...