agriculture news in Marathi, 15 croe 88 lac tree plantation in state, Maharashtra | Agrowon

राज्यात १५ कोटी ८८ लाख वृक्षलागवड
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

राज्यातील पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सरकार काम करत आहे. वृक्षलागवड हा सरकारचा महत्त्वकांक्षी उपक्रम आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकांनी यात सहभाग घेत झाडे लावली. आता ती जगवली जाणार आहे. प्रत्येकांना आता झाडांचे महत्त्व कळले आहे. भविष्यात महाराष्ट्र राज्य वृक्षलागवडीत अव्वल असेल.
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र

नगर ः दुष्काळावर मात करायची असेल तर ‘‘झाडे लावा झाडे जगवा’’ असे अवाहन करत शासनाच्या तेरा कोटी वृक्षलागवडीची ऑगस्ट महिन्यात मोहीम राबवली. त्याला राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळाला आहे. महिनाभरात राबवण्यात आलेल्या अभियानातून राज्यातील मुंबईसह छत्तीस जिल्ह्यामध्ये सुमारे १५ कोटी ८८ लाख ७१ हजार ३५२ वृक्षलागवड झाली आहे. यंदा ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा २२.१३ टक्के जास्ती वृक्षलागवड झाली आहे. वृक्षलागवडीत मराठवाड्यातील चार जिल्हे दुपटीने पुढे आहेत.

राज्यातील अनेक भागाला काही वर्षांपासून दुष्काळाला समारे जावे लागत आहे. वृक्षांची संख्या कमी झाल्यानेच दुष्काळाशी समाना करावा लागत असल्याने राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांपासून वृक्षलागवड मोहीम सुरू केली. आतापर्यंतचा अनुभव पाहता यंदा राज्यातील मुंबईसह ३६ जिल्ह्यांमध्ये १३ कोटी ८४ हजार १०१ वृक्षलागवड करण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या महिनाभरात राबवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सगळ्यांनीच माेहिमेत सहभागी होण्याचे नागरिकांना अवाहन केले. 

वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि अन्य सरकारी विभागासह शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि प्रत्येक नागरिकांनी त्यात सहभाग नोंदवल्याने वृक्षलागवडीला मोठा प्रतिसाद मिळाला आणि उद्दिष्टापेक्षा तब्बल दोन कोटी ८७ लाख वृक्षलागवड जास्ती म्हणजे राज्यात १५ कोटी १५ कोटी ८८ लाख ७१ हजार ३५२ वृक्षलागवड झाली. त्यात वन विभागाने सात कोटी २३ लाख ७३ हजार १६६ झाडे लावली आहेत. सर्वाधिक औरंगाबाद विभागात १८५ टक्के वृक्षलागवड झाली असून, सर्वात कमी पुणे विभागात ८७ टक्के व नागपूर विभागात ९७.१२ टक्के वृक्षलागवड झाली आहे. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उद्दिष्टाच्या दुप्पट लागवड झाली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये ५३ लाख ४४ हजार लागवड झाली आहे. जिल्हा परिषदेने १४ लाख ७३ हजार १६४ झाडे लावली आहेत. त्यासाठी २ लाख ६८ हजार ५४९ नागरिक सहभागी झाले आहेत.

वनमंत्र्यांकडून `सीईओ' चे स्वागत
राज्यात तेरा कोटी वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होत जनजागृती केली. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा कोटी जास्ती वृक्षलागवड केली. शासनाच्या महत्वकांक्षी योजनेला चांगला प्रतिसाद दिला. चार दिवस आधीच संकल्प पूर्ण केल्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केले आहे.

विभाग निहाय वृक्षलागवड (कंसात उद्दिष्ट)

  • औरंगाबाद ः ५ कोटी ५६ लाख ९९ हजार २८७ (२ कोटी ९९ लाख ९३ हजार ७१९)
  • अमरावती ः १कोटी ८६ लाख ३७ हजार ५०७ (१ कोटी ५० लाख ६५ हजार ९६०)
  • कोकण ः १ कोटी ५८ लाख ८३ हजार ४२९ (१ कोटी ४३ लाख ४३ हजार ५२१)
  • नागपूर ः २ कोटी ५१ लाख ०३ हजार १४४ (२ कोटी ५८ लाख ४७ हजार ८८५)
  • नाशिक ः २कोटी ७० लाख ०८ हजार ८११ (२ कोटी ५२ लाख ८८ हजार ७९५)
  • पुणे ः १कोटी ७० लाख ३९ हजार १७५ (१ कोटी ९५ लाख ४४ हजार २२१)

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...