agriculture news in marathi, 15 crore demand for water conservation | Agrowon

जलसंधारणासाठी १५ कोटींची मागणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

नाशिक : गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना अधिक व्यापक स्तरावर राबविण्यासह ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम येत्या काळात युद्धपातळीवर हाती घेण्याचा मनोदय आढावा बैठकीदरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केला. या कामांसाठी १५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च अपेक्षित असून हा निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविल्याने या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

नाशिक : गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना अधिक व्यापक स्तरावर राबविण्यासह ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम येत्या काळात युद्धपातळीवर हाती घेण्याचा मनोदय आढावा बैठकीदरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केला. या कामांसाठी १५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च अपेक्षित असून हा निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविल्याने या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून, या योजनेअंतर्गत झालेल्या कामांचे फायदे भविष्यात शेतकरीवर्गालाच मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होते आहे. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जात  आहे.

गतवर्षी ३५ लाख क्युबिक मीटर काळ काढण्यात आला होता. यंदा दुप्पट अर्थात ७० लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी टाटा ट्रस्ट आणि शेतकऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ते या साठी यंत्रसामुग्री पुरविणार आहेत.

इतर बातम्या
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
टेंभूच्या पाण्यातून दहा बंधारे भरून द्यासोलापूर : टेंभू-म्हैसाळ योजनेतून सांगोला...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
'सिद्धेश्वर यात्रेची कामे समन्वयाने करा'सोलापूर : सिध्देश्वर यात्रा सुरळीतपणे पार...
उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट...देवळा, जि. नाशिक : देवळा तालुक्यात मोठ्या...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
सीताफळ विकासाकडे कृषी सचिवांचे वेधले...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
दुष्काळी स्थितीत प्राधान्याने उपाययोजना...परभणीः परभणी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे...
येणेचवंडी प्रकल्पाला गळतीगडहिंग्लज, जि. कोल्हापूर : येणेचवंडी (ता....
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
पाच मिनिटांत १२० कोटींच्या नियोजनास...जळगाव : समान निधी वाटपाच्या मुद्यावरून गेल्या...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...
नवेगावबांधमध्ये पावसाने शेकडो क्विंटल...नवेगावबांध, जि. गोंदिया : येथील शासकीय...
अधिस्वीकृती समितीच्या बैठकीकडे माफसूचे...नागपूर   ः राज्यातील काही कृषी...