सोलापूर जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी दीड कोटीचा निधी

पाणी योजनांसाठी दीड कोटीचा निधी
पाणी योजनांसाठी दीड कोटीचा निधी

सोलापूर : पाणीटंचाईची वाढती तीव्रता आणि रखडलेल्या पाणी योजनांच्या दुरुस्ती कामासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. माढा व करमाळा तालुक्‍यांतील ७७ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी एक कोटी ५९ लाख ७० हजार रुपयांचा निधी नुकताच पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी मंजूर केला.

 प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांमध्ये कोर्टी (ता. करमाळा) गावच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्तीसाठी ३६ लाख ५५ हजार, तर जेऊर व २९ गावांसाठी ४७ लाख १४ हजारांचा निधी मंजूर झाला. व्होळे (ता. माढा) व २८ गावांसाठी ४६ लाखाचा निधी मिळणार आहे. 

त्याशिवाय जिल्हा परिषदेने १०९ ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी ९० लाखांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती, ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना दुरुस्त करणे, विहिरींचे खोलीकरणाची कामे आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातील १८ दुरुस्तीच्या कामांसाठी ४६ लाख रुपये, बार्शी तालुक्‍यातील एका कामासाठी तीन लाख, करमाळ्यातील  १५ दुरुस्तीच्या कामांसाठी ४२ लाख, माढ्यातील १४ कामांसाठी ३१ लाख, माळशिरसच्या ११ कामांसाठी २८ लाख, मंगळवेढा येथील आठ कामांसाठी २४ लाख, मोहोळच्या १५ कामांसाठी ४३ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com