agriculture news in marathi, 15 days Deadline for moong and urad registration , Maharashtra | Agrowon

मूग, उडदाच्या नोंदणीला १५ दिवसांचीच मुदत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

अकोला ः किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने मूग, उडीद खरेदी केली जात असून, अाॅनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात अाली आहे. मूग, उडदासाठी मंगळवार (ता. २५) पासून ९ अाॅक्टोबरपर्यंत म्हणजेच १५ दिवसांची मुदत देण्यात अाली अाहे. तर सोयाबीनसाठी १ ते ३१ अाॅक्टोबर अशी अाॅनलाइन नोंदणीची मुदत अाहे. मात्र प्रत्यक्ष खरेदी केव्हापासून सुरू होणार याबाबत स्पष्टता नाही.

अकोला ः किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने मूग, उडीद खरेदी केली जात असून, अाॅनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात अाली आहे. मूग, उडदासाठी मंगळवार (ता. २५) पासून ९ अाॅक्टोबरपर्यंत म्हणजेच १५ दिवसांची मुदत देण्यात अाली अाहे. तर सोयाबीनसाठी १ ते ३१ अाॅक्टोबर अशी अाॅनलाइन नोंदणीची मुदत अाहे. मात्र प्रत्यक्ष खरेदी केव्हापासून सुरू होणार याबाबत स्पष्टता नाही.

या वर्षी हमीभावाने खरेदी पणन महासंघ (मुंबई) व विदर्भ पणन महासंघ (नागपूर) यांच्याकडून केली जाणार आहे. सद्यःस्थितीत बाजारपेठेत या तीनही शेतीमालाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शासकीय खरेदीसाठी सातत्याने मागणी केली जात होती. अखेरीस शासनाने २५ सप्टेंबरपासून अाॅनलाइन नोंदणीचे सुरू केली आहे. मूग व उडीद विक्रीच्या दृष्टीने अाॅनलाइन नोंदणीसाठी १५ दिवस देण्यात अालेले असले तरी त्यानंतरसुद्धा जर अावक झालीच, तर खरेदी सुरू झाल्यापासून पहिले १५ दिवस नोंदणी होऊ शकेल. त्यानंतर मात्र ही नोंदणी करता येणार नाही.

या वेळी पोर्टलवर नोंदविल्या जाणाऱ्या पीक क्षेत्राचा सातबारा व प्रत्यक्ष स्थळ पाहणी कृषी व महसूल विभागाकडून केली जाणार अाहे. शासनाने सध्या केवळ नोंदणीबाबत निर्देश दिले अाहेत. खरेदी केंद्र कधीपासून कार्यान्वित होतील, याचे अादेश जिल्हा यंत्रणांना अद्याप मिळालेले नाहीत. 

असे आहेत हमीभाव
या हंगामासाठी केंद्राने मुगाला प्रतिक्विंटल ६९७५ रुपये, तर उडदाला ५६०० हमीभाव जाहीर केलेला अाहे. सोयाबीनला ३३९९ रुपये दर अाहे. मूग, उडदासाठी २५ सप्टेंबर ते ९ अाॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात अाली अाहे. तर सोयाबीनसाठी १ ते ३१ अाॅक्टोबर अशी अाॅनलाइन नोंदणीची मुदत अाहे.

कागदपत्रे आणि आर्द्रता
अाॅनलाइन नोंदणीसाठी आधार कार्डची प्रत, मूग, उडीद किंवा सोयाबीन या पिकांची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावयाचा आहे. शेतकऱ्याचा कार्यरत असलेला मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर द्यावयाचा आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविले जाणार अाहे. शेतकऱ्यांनी ज्या केंद्रावर नोंदणी केलेली आहे, त्याच केंद्रावर माल विकता येईल. एफएक्यू दर्जाचा माल म्हणजेच काडीकचरा नसलेला, चाळणी करून व सुकवून १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसलेला शेतीमाल आणावा.

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...