agriculture news in marathi, 15 lakh people depend on tanker water | Agrowon

मराठवाड्यात १५ लाख ३८ हजार जनतेची तहान टॅंकरवर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 जून 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील उस्मानाबाद वगळता सातही जिल्ह्यांतील ७४९ गाव व १७० वाड्यांमधील १५ लाख ३८ हजार ८३४ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. टॅंकर व थेट पाणीपुरवठ्यासाठी २०९९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, ९३६ टॅंकरने लोकांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील उस्मानाबाद वगळता सातही जिल्ह्यांतील ७४९ गाव व १७० वाड्यांमधील १५ लाख ३८ हजार ८३४ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. टॅंकर व थेट पाणीपुरवठ्यासाठी २०९९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, ९३६ टॅंकरने लोकांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

पावसाळा तोंडावर आला असताना टंचाईग्रस्त गावांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. गत आठवड्यात मराठवाड्यातील ६७३ गाव व १४४ वाड्यांना टंचाईच्या झळा बसत होत्या. या गाव वाड्यांमधील १४ लाख ८० हजार ७७६ लोकांना टंचाईचा सामना करावा लागत होता. आता टंचाईग्रस्त गाव, वाड्यांमध्ये ७६ गावं व २६ वाड्यांची भर पडली आहे. शिवाय गत आठवड्यात टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ८७२ टॅंकरची सोय करण्यात आली होती. त्यामध्ये आता पुन्हा ६४ टॅंकरची वाढ करण्यात आली आहे.

पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या लोकसंख्येतही ५८ हजार ५८ लोकांची भर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक ५६० गाव, वाड्यांना टंचाईच्या झळा बसत आहेत. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात १२३, परभणीमधील ५०, हिंगोलीतील २३, नांदेडमधील १४४, बीडमधील १६, लातूरमधील ३ गाव, वाड्यांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र, अजून टंचाईचा सामना करण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची वेळ आल्याचे चित्र नाही. परंतु उस्मानाबाद जिल्ह्यात टॅंकर व्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी ४१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठा करण्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरींची संख्या मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांतील पाणीटंचाईच्या झळांची तीव्रता अधोरेखित करीत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २५१, जालना जिल्ह्यात २११, परभणी जिल्ह्यात १८२, हिंगोली जिल्ह्यात २७६, नांदेड जिल्ह्यात ३९४, बीड जिल्ह्यात १३४, लातूर जिल्ह्यात १०४ तर टॅंकरच सुरू करण्याची वेळ न आलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात ४१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रत्यक्षात टॅंकरची संख्या कमी असताना पाणीपुरवठ्यासाठी विहिरींची संख्या मात्र घटत्या भूजल स्तराकडेही लक्ष अधोरेखित करते आहे.

जिल्हानिहाय
टॅंकरची संख्या
जिल्हानिहाय
विहिरी अधिग्रहण
औरंगाबाद.....६०६ औरंगाबाद.....५००
जालना.........१२५ जालना.........३२८
परभणी.........४२ परभणी..........२११
हिंगोली.........२१ हिंगोली.........२९२
नांदेड...........१२४ नांदेड...........४८२
बीड.............१५ बीड.............१३९
लातूर............३ लातूर............१०६

 

 

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...