agriculture news in marathi, 15 lakh tonnes sugar excess than estimate | Agrowon

राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढले
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 मार्च 2018

कोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा १५ लाख मॅट्रिक टन साखरेचे जादा उत्पादन झाले आहे. केंद्र, राज्य पातळीवर प्रलंबित असणाऱ्या निर्णयाचा फटका आता पुढील हंगामात बसण्याची शक्यता आहे. साखरेचे दर वाढत नसल्याने राज्यातील कारखान्यांची पुढील हंगामात ही किमान ‘एफआरपी’ची रक्कम देताना कसरतच होणार आहे. 

कोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा १५ लाख मॅट्रिक टन साखरेचे जादा उत्पादन झाले आहे. केंद्र, राज्य पातळीवर प्रलंबित असणाऱ्या निर्णयाचा फटका आता पुढील हंगामात बसण्याची शक्यता आहे. साखरेचे दर वाढत नसल्याने राज्यातील कारखान्यांची पुढील हंगामात ही किमान ‘एफआरपी’ची रक्कम देताना कसरतच होणार आहे. 

राज्यात सध्या गळीत हंगाम हळूहळू अंतिम टप्‍प्यात येत आहे. कमी क्षमतेचे कारखाने बंद होत आहेत. कारखाने बंद होताना ही कारखान्याकडे पुरेशी रक्कम नसल्याने उत्पादकांची बाकी ठेवूनच कारखाने बंद होत आहेत. याबाबतीत धोरणात्मक निर्णय न झाल्यास थकबाकीचा हा ''धोंडा'' पुढील हंगामातपर्यंत कायम राहण्याची भीती आहे. ज्या शेतकऱ्यांची ऊस तोडणी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात झाली त्या ऊस उत्पादकांना प्रामुख्याने कारखान्याची थकबाकी लवकर मिळण्याची शक्यता धूसर बनत आहे. साखरेच्या उत्पादनात व दर देण्यात आघाडीवर असणाऱ्या कारखान्यांचीच अवस्था केविलवाणी होत असल्याने राज्यातील इतर भागांतही  कारखाने आणि उत्पादक या दोघांची अवस्था बिकट झाली आहे.

राज्यात मार्चच्या पहिल्या सप्ताहाअखेर ७७९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून ८७ लाख मॅट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सुरवातीच्या अंदाजानुसार या कालावधीपर्यंत ६५० लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप होऊन त्यातून ७२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज होता. म्हणजे अंदाजानुसार सुमारे १५ लाख मॅट्रिक टन साखर जादा प्रमाणात तयार झाली आहे. यात पुन्हा वाढच होण्याची शक्यता आहे. हंगाम संपेपर्यंत अंदाजापेक्षा ४० लाख टन साखरेचे जादा उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी व्‍यक्‍त केला. पुढील हंगामातही उसाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याने अतिरिक साखर साठा ही कारखान्यांची डोकेदुखी बनण्याची शक्यता साखर उद्योगातून व्‍यक्‍त होत आहे.

स्पर्धा जाणवली नाही..
यंदा ऊसतोडणी कामगार कमी आले आहेत. त्यातच साखरेच्या दरात स्थिरता नसल्याने कार्यक्षेत्र सोडून कारखान्यांनी ऊस नेण्याचा प्रयत्न केला नाही यामुळे अपेक्षित स्पर्धा जाणवली नाही. स्वतःकडे नोंदणी केलेल्या उसाचे गाळप वेळेत होण्यासाठीच कारखाने झगडत असल्याचे दृश्‍य ऊसपट्यामध्ये आहे.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...