agriculture news in marathi, The 15 tank deficits of the tanker in Nanded | Agrowon

नांदेडमध्ये टॅंकरच्या १५ खेपा कमी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 जून 2019

नांदेड : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे झाले आहे. सोमवारपर्यंत (ता. १०) जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील १०२ लोकवस्त्यांवरील १ लाख ६५ हजार १५०, तर लोहा नगर पंचायतीतंर्गंत ३० हजार लोकसंख्येसाठी एकूण १३७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, असे पाणीटंचाई निवारण कक्षातील सूत्रांनी सांगितले.

नांदेड : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे झाले आहे. सोमवारपर्यंत (ता. १०) जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील १०२ लोकवस्त्यांवरील १ लाख ६५ हजार १५०, तर लोहा नगर पंचायतीतंर्गंत ३० हजार लोकसंख्येसाठी एकूण १३७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, असे पाणीटंचाई निवारण कक्षातील सूत्रांनी सांगितले.

मुखेड, कंधार, लोहा तालुक्यातील प्रत्येकी ३ आणि लोहा नगरपंचायतीअंतर्गत ६ अशा एकूण १५ खेपा कमी झाल्या आहेत. अर्धापूर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद हे चार तालुके टॅंकरमुक्त आहेत. मुखेड तालुक्यात सर्वाधिक ९९ टॅंकर सुरू आहेत. येथील ४२ लोकवस्त्यांवरील ६९ हजार ३८४ लोक पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून आहेत.

टॅंकरच्या एकूण २५७ खेपा मंजूर आहेत. प्रत्यक्षात २४२ खेपा झाल्या आहेत. लोहा नगर पंचायतीअंतर्गत ३० हजार लोक टॅंकरवर अवलंबून आहेत. पाणीटंचाई उद्‍भवलेल्या १ हजार ६० गावातील १ हजार ६६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागांत पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यामुळे ग्रामस्थांना काहिसा दिलासा मिळाला. विहिरी, कूपनलिका, तलाव, प्रकल्पांचे जलाशयांत पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. तोपर्यंत टंचाईग्रस्त भागातील ग्रामस्थांना टॅंकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.

इतर बातम्या
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी... कोल्हापूर  : अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
आमदार दीपिका चव्हाण यांनी मांडली...नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व चांदवड तालुक्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको...नाशिक  : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...