agriculture news in marathi, 15 thousand 5 hundred soil health car distributed in state | Agrowon

राज्यात साडेपंधरा लाख माती आरोग्यपत्रिकांचे वाटप
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जानेवारी 2018

पुणे : राज्यातील साडेपंधरा लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत जमीन आरोग्यपत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे. जमीन आरोग्यपत्रिका वाटपासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातून उपलब्ध झालेला आहे. 

जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता विचारात न घेता रासायनिक खतांच्या कमी-जास्त वापर केला गेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतजमिनींचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. जमिनींच्या आरोग्य सुधारणेसाठी खतांचा संतुलित वापर करण्याचा आग्रह केंद्र शासनाचा आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला.

पुणे : राज्यातील साडेपंधरा लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत जमीन आरोग्यपत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे. जमीन आरोग्यपत्रिका वाटपासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातून उपलब्ध झालेला आहे. 

जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता विचारात न घेता रासायनिक खतांच्या कमी-जास्त वापर केला गेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतजमिनींचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. जमिनींच्या आरोग्य सुधारणेसाठी खतांचा संतुलित वापर करण्याचा आग्रह केंद्र शासनाचा आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला.

राज्याच्या मदतीने आरोग्यपत्रिका वाटपाची मोहीम २०१५ पासून केंद्राने हाती घेतली आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात पावणेबारा लाख माती नमुने तपासण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, कृषी खात्याने चांगल्या नियोजनामुळे उद्दिष्टापेक्षा १२७ टक्के म्हणजे १५ लाख नमुने काढले आहेत. बागायती जमिनीसाठी अडीच हेक्टर क्षेत्रातून एक नमुना आणि जिरायती भागात दहा हेक्टर जमिनीतून एक नमुना गोळा करणे बंधनकारक करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्यपत्रिका वाटण्यात सध्या पुणे विभाग आघाडीवर आहे. 

शेतकऱ्याची भेट घेऊन माती नमुने काढण्याची जबाबदारी शासनाने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर सोपविलेली आहे. मात्र, शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे कृषी विभागातील इतर कर्मचारी, विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी, माती चाचणी प्रयोगशाळेचे कर्मचारी, तसेच कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची आदी घटकांची मदत घेता येते. माती नमुना गोळा करण्यासाठी उपलब्ध घटकांची मदत घेण्याचे अधिकार संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

एका आरोग्यपत्रिकेसाठी ३०० रुपये खर्च 
माती तपासणीसाठी कृषी खात्याच्या ३१ प्रयोगशाळा वापरल्या जात आहेत. याशिवाय १३७ खासगी प्रयोगशाळांचीदेखील मदत घेतली जात आहे. ''जमीन आरोग्यपत्रिका तयार करण्यासाठी एकूण १६८ प्रयोगशाळा वापरल्या जात आहेत. या प्रयोगशाळांची माती तपासणीची वार्षिक क्षमता १४ लाख ६० हजार नमुन्यांची आहे. सरकारकडून एक आरोग्यपत्रिका तयार करण्यासाठी ३०० रुपये खर्च केले जात आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

विभागनिहाय जमीन आरोग्यपत्रिका वाटप

पुणे ४.२५ लाख
नाशिक २.५४ लाख
ठाणे ३० हजार
कोल्हापूर १.८७ लाख
औरंगाबाद १.८४ लाख
लातूर १.५९ लाख
अमरावती ६३ हजार
नागपूर ८९ हजार

 

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...