agriculture news in Marathi, 15 thousand brass mud from the Rayawadi lake | Agrowon

रायवाडी तलावातून १५ हजार ब्रास गाळ काढला
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणाऱ्या रायवाडी लघुपाटबंधारे तलावातून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवाय योजनेतून गेल्या दोन महिन्यांत १५ हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणीसाठ्यात वाढ होईल, अशी आशा आहे. 

सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणाऱ्या रायवाडी लघुपाटबंधारे तलावातून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवाय योजनेतून गेल्या दोन महिन्यांत १५ हजार ब्रास गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणीसाठ्यात वाढ होईल, अशी आशा आहे. 

सन १९७२ मध्ये रायवाडी लघुपाटबंधारे तलाव बांधण्यात आला. या तलावाची पाणी साठवण क्षमता ९८ दशलक्ष घनफूट इतकी आहे. या तलावाच्या परिसरात सुमारे सात गावांतील शेतीला पाणीपुरवठा होतो. ४७ वर्षांत प्रथम हा तलाव कोरडा पडला आहे. यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे.  हा तलाव एकदा भरला की, तीन ते चार वर्षे यातील पाणी पातळी कमी होत नाही. मात्र, मागील काही वर्षांपासून रायवाडी तलाव पाणलोट क्षेत्रात कमी झालेले पर्जन्यमान, मोठ्या प्रमाणात होणारा पाणी उपसा यामुळे गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. तर चालू वर्षी जानेवारीतच हा तलाव कोरडा पडला होता. 

राज्य शासनाने कोरडे पडलेले तलाव, धरणे, नद्या, अशा जलस्तोत्रातील गाळ काढणे व पाणीसाठा वाढविण्याचा निर्णय घेतला. या आदेशाची अंमलबजावणी कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालयाने रायवाडी तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू केली. या तलावातील सुमारे ५६ हजार घनमीटर गाळ काढण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सध्या गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता ६८ दशलक्ष घनमीटर असून १७ दशलक्ष घनमीटर मृत संचय पाणीसाठी आहे. पण गाळामुळे हा मृत संचय साठा ७ ते ८ घनमीटर इतका कमी झाला आहे. गाळ काढल्याने १० ते १२ घनमीटर पाणीसाठा वाढविणे शक्य झाले आहे. 

नागज कालव्यातून रायवाडीसाठी पाणी न्यावे 
सध्या टेंभू योजनेच्या नागज कालव्यातून पाणी दुधेभावी तलाव तसचे पुढे सोडण्यात आले आहे. रायवाडी तलावातून नागज, आरेवाडी या दोन गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांची पाइपलाइन टाकलेली आहे. तसेच काही खासगी शेतकऱ्यांच्या पाइपलाइन तलावातून आल्या आहेत. त्यांचा वापर करून प्रशासनाने टंचाई परिस्थितीची तातडीची गरज म्हणून हे पाणी रायवाडी तलावात नेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. नागजच्या कालव्यातून रायवाडी तलावात टेंभूचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होऊ लागली आहे.

इतर बातम्या
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
शिकारीमुळे स्थानिक अन्नसुरक्षेवर होतोय...वर्षावनातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत...
नाशिकला डोंगराची काळी मैना विक्रीसाठी...नाशिक : आदिवासी भागात सध्या मोठ्या प्रमाणावर...
सिन्नर तालुक्यातील छावण्यांमध्ये १०९४...नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात अधिग्रहित विहिरींना...उमरखेड, यवतमाळ ः पाणीटंचाई निवारण्यासाठी म्हणून...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
हिंगोली : टॅंकरद्वारे ५६ हजार...हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या गंभीर...
अंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शनअकोला ः मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
चारा, पाण्याची व्यवस्था करा : आमदार...सांगोला, जि. सोलापूर  : राज्यात दुष्काळी...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
गाळ उपसण्यासाठी गावकऱ्यांचे ‘एकीचे बळ'संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी : ‘एकीचे बळ मिळते फळ’...
सोलापूर, माढ्याचा निकाल उशिरासोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...