agriculture news in Marathi, 150 crore Agriculture mechanization subsidy transfer in farmers bank accounts, Maharashtra | Agrowon

कृषी यांत्रिकीकरणच्या अनुदानाचे १५० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

पुणे : राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदान वाटपाला कृषी आयुक्तांनी वेग दिला असून, आतापर्यंत २६ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत दीडशे कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

अवजार खरेदीत गेल्या अनेक वर्षांपासून भानगडी चालत होत्या. मात्र, राज्य शासनाने अवजार खरेदीत पारदर्शकता आणल्यानंतर आता निधी शिल्लक राहत असल्याचे दिसून येते. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून निधीवाटपाचा सतत आढावा घेतला जात असून, अर्जदार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत लवकरात लवकर अनुदान जमा करावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

पुणे : राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदान वाटपाला कृषी आयुक्तांनी वेग दिला असून, आतापर्यंत २६ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत दीडशे कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

अवजार खरेदीत गेल्या अनेक वर्षांपासून भानगडी चालत होत्या. मात्र, राज्य शासनाने अवजार खरेदीत पारदर्शकता आणल्यानंतर आता निधी शिल्लक राहत असल्याचे दिसून येते. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून निधीवाटपाचा सतत आढावा घेतला जात असून, अर्जदार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत लवकरात लवकर अनुदान जमा करावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी) वर्षानुवर्षे अवजार वाटप योजनेची एकमेव एजन्सी म्हणून काम करीत होते. त्यामुळे चटावलेल्या अधिकाऱ्यांनी या योजनेत भरपूर मलिदा लाटला. अवजार वाटपात यंदा थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) धोरण लावण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यांत थेट अनुदान जात आहे. 

यांत्रिकीकरणासाठी चार योजनांमधून अनुदान वाटले जात आहे. त्यापैकी सर्वांत जास्त अनुदान ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जात आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रतिशेतकरी सव्वा लाख रुपयांपर्यंत अनुदान वाटले गेले असून, पॉवर टिलरसाठी ७५ हजार रुपयांपर्यंत तसेच रोटाव्हेटरसाठी ६३ हजार रुपयांपर्यंत अनुदान वाटले गेले आहे.

अवजार खरेदी केलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना यंदा आतापर्यंत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून ९ कोटी ३१ लाख रुपये व राष्ट्रीय गळीतधान्य व तेलबिया विकास योजनेतून पाच कोटी रुपयांचे अनुदान वाटले गेले आहे. याशिवाय कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून २७ कोटी ७ लाख आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १०९ कोटी १० लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत वर्ग करण्यात आले आहेत. 

‘‘राज्यात यंदा विविध प्रकारच्या १६ अवजारांसाठी अनुदान दिले जात आहे. मात्र, एका शेतकऱ्याला कोणत्याही एकाच अवजारासाठी अनुदान दिले जात आहे. अनुसूचित जातीच्या १३६० शेतकऱ्यांना १० कोटी २३ लाख रुपये, तर अनुसूचित जमातीच्या ११४४  शेतकऱ्यांना ८ कोटी ३१ लाख रुपये मिळाले आहेत,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

सर्वसाधारण गटातील शेतकरी आघाडीवर
अवजार वाटपात अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना विशेष सवलत असली, तरी कृषी यांत्रिकीकरणासाठी सर्वसाधारण गटातील शेतकरी आघाडीवर आहेत. यंदा सर्वसाधारण गटातील २३ हजार १९७ शेतकऱ्यांनी आतापर्यंत अवजार खरेदी करून अनुदानासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी सर्वसाधारण गटातील २१ हजार ३०३ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत अनुदानापोटी १३२ कोटी रुपये वर्ग केले गेले आहेत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. 

डीबीटीमुळे गैरव्यवहाराला चाप
केंद्र व राज्य शासनाचा भरपूर निधी अवजार अनुदानासाठी आहे. मात्र, डीबीटीसारखे कडक निकष आणि एमआयडीसीचा हस्तक्षेप नसल्यामुळे निधी कमी खर्च झाल्याचे दिसून येते. अर्थात, निधी कमी खर्च झाला तरी चालेल; पण त्यात गैरव्यवहार होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे यंदा कोणत्याही पात्र शेतकऱ्यावर अनुदान वाटपात अन्याय झालेला नाही, असा दावा कृषी विभागाच्या सूत्रांनी केला       आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
बॅंकेच्या चकरा अन् कागदपत्रांच्या...धुळे ः मागील दोन - तीन महिन्यांपासून पीककर्जासाठी...
‘ई-नाम’मधील १४५ बाजार समित्यांसाठी हवेत...पुणे ः शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल देशातंर्गत...
सुमारे साठ एकरांवर ‘ड्रीप अॅटोमेशन’पाणी व खतांचा काटेकोर वापर करण्याबाबत अनेक शेतकरी...
भारताकडून अमेरिकेच्या हरभरा, तुरीच्या...नवी दिल्ली ः अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या...
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरीपुणे ः राज्यातील अनेक भागांत शुक्रवारी (ता. २२)...
माॅन्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थितीपुणे : माॅन्सूनला राज्यातून पुढे सरकण्यास अनुकूल...
राज्यात आजपासून प्लॅस्टिकबंदी...मुंबई : राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या...
धान्याला कीड लागताच सेन्सर देणार माहितीकऱ्हाड, जि. सातारा : साठवणूक केलेल्या ठिकाणी अथवा...
साखर निर्यातीचा कोटा ८० लाख टन करण्याची...कोल्हापूर : साखर निर्यातीची कोटा ८० लाख टन करावा...
सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव...अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू...
शेती म्हणजे तोटा हे सूत्र कधी बदलणार? शेती कायम तोट्यात कंटूर मार्करचे संशोधक व शेती...
‘ई-नाम’ची व्याप्ती सर्वांच्या...स्पर्धाक्षम, पारदर्शक व्यवहारातून शेतीमालास अधिक...
कांदा बाजारात दरवाढीचे संकेतनाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये...
उपराष्ट्रपती आज बारामतीतबारामती ः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बहुस्तरीय...पुणे ः शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन,...
कापूस बाजारात भारताला संधीन्यूयाॅर्क ः चालू कापूस हंगामात पिकाला फटका...
मॉन्सून सक्रिय होण्यास प्रारंभ पुणे  ः अरबी समुद्र आणि हिंदी महासागर...
थकली नजर अन्‌ पाय...औरंगाबाद : घोषणा झाली, पण काय व्हतंय कुणास ठाऊक,...
हास्य योगाद्वारे सरकारचा निषेधनागपूर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा अभिनव...
माळरानावर साकारले फायदेशीर शेतीचे स्वप्नमनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर...