agriculture news in marathi, 150 lakh ton cotton Pending in country | Agrowon

दीडशे लाख क्विंटल कापूस शिल्लक
चंद्रकांत जाधव
सोमवार, 14 मे 2018

जळगाव : देशात आजघडीला सुमारे १५० लाख क्विंटल कापूस (३० लाख गाठी) शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. जानेवारीनंतर कापूस दरात फारशी वाढ झालेली नाही. तीन महिन्यांत दर क्विंटलमागे ४०० रुपयांनी घसरल्याने कापूस उत्पादकांचे सुमारे ६०० कोटींचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

जळगाव : देशात आजघडीला सुमारे १५० लाख क्विंटल कापूस (३० लाख गाठी) शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. जानेवारीनंतर कापूस दरात फारशी वाढ झालेली नाही. तीन महिन्यांत दर क्विंटलमागे ४०० रुपयांनी घसरल्याने कापूस उत्पादकांचे सुमारे ६०० कोटींचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

 सरकीच्या दरांवर दबाव राहिला. याच वेळी सरकीचे दर नोव्हेंबर २०१७ नंतर घसरतच राहिले. एप्रिल २०१८ मध्ये सरकीचे दर १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. परिणामी कापूस उत्पादकांना अपेक्षित दर मिळू शकले नाहीत व बाजारातील दरांवरचा दबाव कायम राहिला. यातच मागील आठ दिवसांत सरकीचे दर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढले आहेत. त्याचा सर्वंकष लाभ मात्र कापूस उत्पादकांना मिळू शकत नाही. कारण सुमारे ३४० लाख गाठींच्या कापसाची आवक बाजारात झाली आहे. अर्थातच एवढा कापूस व्यापारी, खरेदीदारांनी घेऊन त्यापासून रुई तयार केली आहे. 

यंदाच्या हंगामात देशात ३७० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज कॉटन असोसिएशनने जाहीर केला आहे. तर ११ कोटी १० लाख मेट्रिक टन सरकीचे उत्पादन हाती आले आहे. पाच क्विंटल कापसात सव्वातीन क्विंटल सरकी मिळते. सरकीचे दर दबावात राहिल्याने जिनींग व प्रेसिंग व्यावसायिकांना कमी मार्जीनने सरकीची विक्री करावी लागली, असे जाणकारांचे म्हणणे आहे. सरकीचे दर अलीकडेच वाढून ते १६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. तर रुईचे दर सध्या दर्जेदार खंडिला (३५६ किलो रुई) ४१००० रुपये व दुय्यम दर्जाच्या खंडिला ३८००० रुपये दर आहे. कापसाचे दर (जळगाव) ४७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर किडक्‍या किंवा कमी दर्जाच्या कापसाला यापेक्षा कमी दर आहेत. जानेवारीच्या मध्यात कापसाचे दर ५१०० रुपये प्रतिक्विंटल होते. त्यात मध्यंतरी फारशी वाढ झाली नाही. देशात गुजरात व महाराष्ट्रात मिळून सुमारे २५ लाख गाठींचा कापूस शिल्लक आहे. तर तेलंगण, मध्य प्रदेश, कर्नाटकातही काही प्रमाणात शेतकऱ्यांकडे कापूस आहे. यातील कमाल कापूस उत्तम दर्जाचा आहे, असे सांगण्यात आले. 

देशात अद्याप सुमारे १५० लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. पूर्वी ३६२ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. आता ३७० लाख गाठींचे उत्पादन होईल, असे संकेत आहेत. सरकीचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. सरकीच्या दरात किंचीत वाढ झाली असून, यामुळे दर स्थिर राहतील. 
- अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

मॉन्सून नव्या हंगामात चांगला बरसेल, असे संकेत आल्यानंतर बाजारात गाठींची खरेदी काहीशी कमी झाली आहे. पण कापूस दर स्थिर आहेत. जानेवारीनंतर सरकीचे दर घसरल्याने कापूस उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. 
- दिनेश हेगडे, कापूस निर्यातदार, मुंबई

आकडे दृष्टिक्षेपात

  • ५० लाख क्विंटल : कापूस देशात शेतकऱ्यांकडे शिल्लक
  • ६० लाख : गाठींची निर्यात
  • ११ कोटी १० लाख मेट्रिक टन : सरकीचे उत्पादन
  • ४१००० रुपये : उत्तम दर्जाच्या खंडीचा दर
  • २०० रुपयांनी : सरकीच्या दरात क्विंटलमागे वाढ

इतर अॅग्रोमनी
कांद्यातील नरमाई किती काळ?कां द्याच्या बाजारात जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८...
शेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा...राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना...
सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढीचा कलएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात गवार बी, गहू व हरभरा...
सरकारने साखर आयात केली नाही कोल्हापूर : सरकारने पाकिस्तानातून कोणतीही साखर...
दीडशे लाख क्विंटल कापूस शिल्लकजळगाव : देशात आजघडीला सुमारे १५० लाख क्विंटल...
गवार बी वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स...एनसीडीइएक्स मध्ये या सप्ताहात हळद, गहू व हरभरा...
पंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक...चंडीगड : पंजाब राज्यात सरकारी संस्था आणि...
कशी रोखणार पुरवठावाढ?शेतीमाल पुरवठावाढ ( Supply glut) ही मोठी ...
साखरेचा बफर स्टॉक न केल्यास अडचणी...पुणे : देशातील साखरेचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे...
एमार कंपनी महाराष्ट्रात अन्न...मुंबई : अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची...
मक्याच्या भावात घसरणया सप्ताहात सर्वात अधिक घसरण गवार बी मध्ये (८.६...
तीन महिन्यांनंतर परतली तेजी; बाजार उसळलाजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ब्रॉयलर्सच्या...
डॉलर वधारल्याने कापसात निर्यात संधीजळगाव : रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलरचे दर ६६ रुपये...
चीनमध्ये सोयापेंड निर्यातीला संधीनवी दिल्ली : अलीकडच्या काळात जागतिक दोन आर्थिक...
सरासरी मॉन्सूनमुळे २८.३ दशलक्ष टन...नवी दिल्ली : चांगल्या मॉन्सूनच्या हजेरीच्या...
मका वगळता सर्व पिकांच्या भावात वाढया सप्ताहात हळद, गहू व गवार बी यांच्यातील किरकोळ...
भारतीय कापसाची सर्वाधिक आयात...जळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
आंबा निर्यातीला सुरवातपुणे  ः महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वाशी...
पंजाबात गव्हाची ३५ लाख टन खरेदीचंडिगड : पंजाब राज्यात बुधवार (ता.१८) पर्यंत ३४....