agriculture news in marathi, 154 forms demanding Agri processing unit subsidy | Agrowon

कृषी प्रक्रिया प्रकल्प अनुदानासाठी १५४ अर्ज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पुणे : राज्यात पाच वर्षांच्या कालावधीसाठी सुरू झालेल्या मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजनेतून अनुदान मिळण्यासाठी १५४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून या प्रकल्पांना अनुदान मिळण्यासाठी अंतिम शिफारस केली जाणार आहे. या योजनेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. निधीची उपलब्धता पाहून उद्योजकांच्या प्रस्तांवाना कृषी विभाग मान्यता देणार आहे.

पुणे : राज्यात पाच वर्षांच्या कालावधीसाठी सुरू झालेल्या मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजनेतून अनुदान मिळण्यासाठी १५४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून या प्रकल्पांना अनुदान मिळण्यासाठी अंतिम शिफारस केली जाणार आहे. या योजनेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. निधीची उपलब्धता पाहून उद्योजकांच्या प्रस्तांवाना कृषी विभाग मान्यता देणार आहे.

जास्तीत जास्त ५० लाखांपर्यंत अनुदानाची तरतूद या योजनेत आहे. मात्र, अनुदानासाठी उद्योजकाने कर्ज काढणे अत्यावश्यक आहे. अनुदान रकमेच्या किमान दीडपट तरी कर्ज घेतलेले असावे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

कर्ज मंजूर करणार असल्याचे पत्र बॅंकेकडून मिळाल्यानंतर संबंधित उद्योजक पुढे ‘मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजने’तून अनुदान मिळण्यासाठी अर्ज करू शकतो. सध्या प्राप्त झालेल्या अर्जांबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून छाननी होऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून सदर प्रस्ताव आयुक्तांकडे येतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

कृषी आयुक्त श्री. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या समितीसमोर सदर प्रस्ताव मांडले जातील. या समितीत पशुसंवर्धन आयुक्त, मत्स्य आयुक्त, कृषी प्रक्रिया उपसचिव, उद्योग उपसचिव, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, कृषी प्रक्रिया नियोजन संचालक तसेच सहकार विभागाच्या उपनिबंधक यांचा समावेश करण्यात आला आहे. कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया विभागाचे सहसंचालक या समितीचा सदस्य सचिव आहेत.

"मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना" कशी चालविली जाते यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक वेगळी समिती नियुक्त केली आहे. या समितीचे सदस्य म्हणून पणन, उद्योग, पशुसंवर्धन तसेच सहकार मंत्रालयाच्या मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

कृषी प्रक्रिया प्रकल्पांच्या अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज
 ऊस प्रक्रिया  २
 फळे-भाजीपाला प्रक्रिया  २९
 कडधान्य प्रक्रिया  २१
 धान्य प्रक्रिया  १३
 शीतगृहे  ६
 मशरूम प्रक्रिया  ३
 पास्ता  १
 राइस मिल  ४
 काजू प्रक्रिया  ४८
 मसाला प्रक्रिया  ८
 जैव अन्नप्रक्रिया  १
 खाद्यतेल प्रक्रिया  ६

 

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...