agriculture news in marathi, 15th November ultimatum for prosperity land acquisition of samrudhi | Agrowon

समृद्धी भूसंपादनासाठी १५ नोव्हेंबरचा अल्टिमेटम
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

नाशिक : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, असा अल्टिमेटम सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांनी दिला आहे. त्यामुळे तातडीने निवाडे निकाली काढण्यासाठी यंत्रणेने कंबर कसली असून, दिवाळीनंतर समृद्धी महामार्गाच्या बांधणीचा नारळ फुटण्याची शक्यता आहे.

नाशिक : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, असा अल्टिमेटम सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांनी दिला आहे. त्यामुळे तातडीने निवाडे निकाली काढण्यासाठी यंत्रणेने कंबर कसली असून, दिवाळीनंतर समृद्धी महामार्गाच्या बांधणीचा नारळ फुटण्याची शक्यता आहे.

 समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शिर्डी येथे राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून या महामार्गासाठी जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी दर्शविलेला विरोध, त्यातून उभा राहिलेला संघर्ष, भाऊबंदकीचे वाद आदी अडचणींमुळे अजूनही १०० टक्के जमिनींचे संपादन होऊ शकलेले नाही. जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी या दोन तालुक्यांमधून हा महामार्ग जात असून, शिवडे हे या महामार्गाला सर्वाधिक विरोध करणारे गाव ठरले आहे. परंतु, हा विरोध शमविण्यास प्रशासनाला यश आले असून, महामार्गासाठी आवश्यकता असलेल्या सर्व जमिनींच्या गटांची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

या महामार्गासाठी जिल्ह्यात अजूनही २० टक्के जमिनीचे अधिग्रहण होऊ शकलेले नाही. सिन्नर तालुक्यातील २५ गावांत ४०३ गटांमधील १३६.५९ हेक्टर जमिनीचे संपादन होणे बाकी आहे.

इगतपुरीतील २३ हेक्टर जमिनीची गरज
महामार्गावरून इंटरचेंज करण्यासाठी गोंदे येथील २६ गटांमधील २२.९१ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. इगतपुरीतील पेसा क्षेत्र वगळून इतर वर्ग-१ च्या जमिनीपैकी २७ गटांतील शेतकऱ्यांचे कौटुंबिक व तत्सम वाद आहेत. त्यामुळे १०.५६ हेक्टर क्षेत्र अजूनही संपादित होऊ शकलेले नाही. शेतकऱ्यांनी संमतीने हे क्षेत्र दिल्यास पाचपट, तर भूसंपादन कायद्यान्वये संपादित केल्यास शेतकऱ्यांना चारपट परतावा मिळणार आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...