agriculture news Marathi, 16 agri centers license cancels in Yavatmal district, Maharashtra | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात सोळा कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

यवतमाळ : कीटकनाशक खरेदी केलेल्या एजन्सीचे डीलरचे नाव परवान्यामध्ये समाविष्ट केले नाही. यानंतरही त्यांच्याकडून कीटकनाशकांची खरेदी करून विक्री केल्याप्रकरणी जिल्ह्यातील १६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. कृषी अधीक्षक कार्यालयाने रात्री उशिरा या संदर्भात आदेश काढले. निलबंन कालावधीत संबंधित कृषी केंद्रचालकांना कीटकनाशक विक्रीबंदचे आदेश देण्यात आले आहेत.

यवतमाळ : कीटकनाशक खरेदी केलेल्या एजन्सीचे डीलरचे नाव परवान्यामध्ये समाविष्ट केले नाही. यानंतरही त्यांच्याकडून कीटकनाशकांची खरेदी करून विक्री केल्याप्रकरणी जिल्ह्यातील १६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. कृषी अधीक्षक कार्यालयाने रात्री उशिरा या संदर्भात आदेश काढले. निलबंन कालावधीत संबंधित कृषी केंद्रचालकांना कीटकनाशक विक्रीबंदचे आदेश देण्यात आले आहेत.

कृषी अधीक्षक कार्यालयाने यवतमाळ येथील वैभव एजन्सी, नीलेश कृषी केंद्र (उमरखेड), साई एजन्सी (काळी दौलत), पार्थ एजन्सी, शेतकरी कृषी केंद्र, राजेश कृषी केंद्र (दिग्रस), वैभव एजन्सी (आर्णी), कृषी वैभव (पांढरकवडा), राज कृषी केंद्र, चिंतामणी कृषी केंद्र (वणी), गंगा कृषी केंद्र, कृषी राज, ओमसाई अॅग्रो, पवन अॅग्रो, अंकुश अॅग्रो, तिरुपती अॅग्रोटेक (पुसद) या १६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यांनी निलंबीत केले.

मागील वर्षी कीटकनाशक फवारणीतून अनेक शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा झाली. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला. याचा ठपका कृषी विभागावर ठेवण्यात आला होता. त्यात तत्कालीन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कीटकनाशक कंपन्यांबाबत अद्याप शासनाने कुठल्याही प्रकारे ठोस पावले उचलली नाहीत. जे कीटकनाशक प्रमाणित नव्हते, असे कीटकनाशक लपून-छपून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आले होते.  

कृषी विभागाने तपासणी केल्यानंतर १६ कृषी केंद्रांत अप्राणित कीटकनाशकांचा साठा आढळला. अनेक ठिकाणी त्यांची विक्री होत असल्याचे निर्दशनास आले. परवान्यात नमूद नसलेल्या कीटकनाशकांची साठवणूक व विक्री केली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील १६ कृषी सेंवा केंद्राचे परवाने निलंबीत करण्याचे आदेश कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यांनी दिले.

जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, जिल्हा विकास अधिकारी के. एस. वानखेडे, गुणवत्तानियत्रण अधिकारी एस. बी. जाधव, मोहीम अधिकारी पी. आर. खरडे, एम. एस. अंबाडकर यांनी सुनावणी घेतली.

साठा रजिस्टर तपासणीत माहिती उघड
कृषी केंद्रातील साठा रजिस्टरची तपासणी केली असता, अकोला येथील महेश एंटरप्रायजेस यांच्याकडून कीटकनाशक खरेदी केल्याचे समोर आले. कीटकनाशकांचे स्रोत परवान्यात समाविष्ट न करता खरेदी करण्यात आले. बंदी असतानाही कीटकनाशके खरेदी केल्याने संबंधितांचे परवाने रद्द करण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...
मराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...
कापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी जळगाव ः तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी...
उत्पादन, थेट विक्री, पूरक व्यवसायांतून...कृषी विद्यापीठ, तज्ज्ञ, वाचन, ज्ञान, विविध प्रयोग...
स्वयंपूर्ण, कमी खर्चिक दर्जेदार...पुणे जिल्ह्यातील वेळू येथील गुलाब घुले यांनी आपली...
उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...
...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...
खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...