agriculture news in marathi, 16 market committees closed in Verkhad | Agrowon

वऱ्हाडात १६ बाजार समित्या बंद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

शेतकऱ्यांना अाधारभूत किमतीपेक्षा भाव मिळाला पाहिजे. तो देण्याची केंद्र व राज्याची जबाबदारी अाहे. व्यापाऱ्यांवर बंधने घालणे हे शेतकऱ्यांसाठी धोकादायक अाहे. अशा बळजबरीमुळे व्यापारी बाजारात येणार नाही व खरेदी होणार नाही. शासनाकडे पुरेशी यंत्रणा नाही, हे हमीभावानुसारच्या खरेदीतून वारंवार पुढे आले अाहे. त्यामुळे ही नवी व्यवस्था अाणण्यापूर्वी विचार केला पाहिजे.
-प्रसेनजित पाटील, सभापती, जळगाव जामोद बाजार समिती, जि. बुलडाणा

अकोला : हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्यांविरुद्ध कैद व दंडाची शिक्षा करण्याची सुधारणा शासन करीत असल्याचा विरोध व्यापाऱ्यांमध्ये तीव्र होत चालला अाहे. हा कायदा अमलात अाल्यास अडचणीचे होईल, हे कारण पुढे करीत व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्री व्यवहार करण्यास नकार दर्शविला अाहे. यामुळे कोट्यवधींची उलाढाल असलेल्या बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट अाहे.

ज्या बाजार समिती सुरू अाहेत, त्या ठिकाणी केवळ सोयाबीनची खरेदी केली जात अाहे. सोयाबीनला हमीभावाच्या तुलनेत किंचित अधिक दर असल्याने व्यापारी त्याची खरेदी करीत असल्याचे समजते.      

बुलडाण्यात १३ बाजार समित्यांपैकी आठ बंद आहेत. अकोल्यातील नीस समित्यांमध्ये खरेदी-विक्रीस व्यापाऱ्यांनी नकार दिला आहे. हमीभावाने शेतमाल खरेदी करणे परवडत नाही, तर यापेक्षा  कमी दराने खरेदी केल्यास होणाऱ्या शिक्षेबाबत संभ्रम आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील व्यवहार बंद राहण्यास अाता अाठवडा होत अाहे. या काळात कोट्यवधींचे व्यवहार ठप्प पडलेले अाहेत. शासनाने कैद व दंडाबाबत सुधारणा केल्यासंदर्भात कुठलाही अादेश काढलेला नाही. पुढील महिन्यापासून मूग, तसेच त्यापाठोपाठ उडीद, सोयाबीनचा हंगाम सुरू होणार अाहे. अशा काळात बाजार समित्या बंद राहल्यास त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

बंद बाजार समित्या (जिल्हानिहाय)
बुलडाणा ः बुलाडणा, मलकापूर, जळगावजामोद, संग्रामपूर, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, खामगाव
अकोला ः मूर्तिजापूर, तेल्हारा, अकोट.
वाशीम ः वाशीम, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...