agriculture news in marathi, 16 thousand core crop loan disburse in state | Agrowon

राज्यात सोळा हजार कोटींचे पीक कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

मुंबई : राज्य सरकारने वारंवार सूचना, निर्देश, निर्वाणीचे इशारे देऊनही शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका सरकारलाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे बँकांची तक्रार करूनही राष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतला आहे. जुलैअखेर राज्यात १६ हजार कोटींचे पीककर्ज वितरित झाले, यात राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा अवघा आठ टक्के इतका आहे. तर जिल्हा मध्यवर्ती बँकांनी ६३ टक्के आणि ग्रामीण बँकांनी २९ टक्के पीककर्ज वितरित केले आहे.

मुंबई : राज्य सरकारने वारंवार सूचना, निर्देश, निर्वाणीचे इशारे देऊनही शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका सरकारलाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे बँकांची तक्रार करूनही राष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतला आहे. जुलैअखेर राज्यात १६ हजार कोटींचे पीककर्ज वितरित झाले, यात राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा अवघा आठ टक्के इतका आहे. तर जिल्हा मध्यवर्ती बँकांनी ६३ टक्के आणि ग्रामीण बँकांनी २९ टक्के पीककर्ज वितरित केले आहे.

राज्यात झालेल्या कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्याचे निर्देश सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसोबतच राष्ट्रीयीकृत बँकानाही दिले होते. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका अद्याप उद्धिष्टाच्या सरासरी दहा टक्क्यांच्या आसपासही पोचलेल्या नसल्याने सहकार विभागाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बँकांनी आपले कार्य योग्यरीत्या केले नाही तर त्यांच्याकडे असलेल्या शासकीय ठेवींचा विचार करावा लागेल, असा इशाराही विभागामार्फत देण्यात आला आहे. या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपाचे सरकारचे उद्दिष्ट ४३ हजार ७३१ कोटी रुपयांचे आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हा सहकारी बँका, ग्रामीण बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांना उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी जिल्हा बँकानी आपले उद्दिष्ट बऱ्यापैकी गाठले आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना पीककर्जासाठी ताटकळण्याची पाळी आली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी गाठलेल्या उद्दिष्टाची सरासरी ही आठ टक्क्यांच्या जवळपास आहे. आतापर्यंत वितरण झालेल्या कर्जाची आकडेवारी १६,२८७ कोटी इतकी आहे. राज्याचा विचार करता जिल्हा मध्यवर्ती बँकांनी ६३ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. तर ग्रामीण बँकांनी २९ टक्के कर्ज वितरण केले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय कर्जवाटपाची स्थिती (टक्क्यांमध्ये)
जिल्हा जिल्हा 
बॅंक
राष्ट्रीयीकृत बॅंका
लातूर १०९ १५
उस्मानाबाद ८४ १४
बीड ३७
नांदेड ३५ ११
बुलडाणा ८८ १८
चंद्रपूर ६४ २६
भंडारा ७३ २४
गडचिरोली ७४ २२
सातारा १४० २४
पुणे ६० ३२
कोल्हापूर ११६ २७
सांगली ८३ ३०
नगर ५९ ४४
औरंगाबाद १७ १६
नागपूर ३४ ४१
     

 

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...