agriculture news in marathi, 16-year-old girl commits suicide due to father's debt crisis | Agrowon

वडिलांवरील कर्जाच्‍या चिंतेतून १६ वर्षीय मुलीची आत्‍महत्‍या
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

मालेगाव, जि. नाशिक : वडिलांचे अाजारपण, सततची नापिकी व कर्जाच्या अाेझ्याने वैफल्यग्रस्त झालेल्या डाेंगराळे येथील सकूबाई ऊर्फ धनश्री भिकाजी कर्नर (१६) या तरुणीने शनिवारी (ता. २७) अात्महत्या केली. महसूल विभागाने दिलेल्या अभिप्रायावरून हे स्पष्ट झाले अाहे. तहसीलदार ज्याेती देवरे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन हा प्रकार शेतकरी अात्महत्येचा असल्याचा अहवाल सादर केला.

मालेगाव, जि. नाशिक : वडिलांचे अाजारपण, सततची नापिकी व कर्जाच्या अाेझ्याने वैफल्यग्रस्त झालेल्या डाेंगराळे येथील सकूबाई ऊर्फ धनश्री भिकाजी कर्नर (१६) या तरुणीने शनिवारी (ता. २७) अात्महत्या केली. महसूल विभागाने दिलेल्या अभिप्रायावरून हे स्पष्ट झाले अाहे. तहसीलदार ज्याेती देवरे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन हा प्रकार शेतकरी अात्महत्येचा असल्याचा अहवाल सादर केला.

 डाेंगराळे येथे कुटुंबीयांसह वास्तव्य करणाऱ्या भिकाजी कर्नर यांची चार एकर शेती अाहे. शेतात ते कपाशीची लागवड करतात. मात्र, हा भाग दुष्काळी असल्याने नापिकीमुळे त्यांच्यावर सव्वा लाखाचे कर्ज झाले. अशातच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या उपचारावर मोठा खर्च होत आहे. कुटुंबाची हालाकीची परिस्थिती वडिलांचे आजारपण आणि कर्जामुळे धनश्री कर्नर ही वैफल्यग्रस्त झाली होती. या निराशेतून तिने घरी कोणी नसताना ६ जानेवारीला विषारी औषध प्राशन केले होते. धुळे येथे उपचार सुरू आसताना १२ जानेवारीला तिचा मृत्यू झाला.

येथील तलाठ्यांनी अहवाल सादर केल्याने तलसीलदारांनी कृषी अधिकारी गोकूळ अहिरे, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांच्यासह पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. पाहणीनंतर हा प्रकार शेतकरी आत्महत्येचा असल्याचा अहवाल दिला आहे.

इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात खरेदी केंद्रांतील...जळगाव : कडधान्य खरेदीसंबंधी शासकीय खरेदी...
टंचाईत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा ः...नांदेड ः टंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे...
वऱ्हाडात सहा तालुक्‍यांत गंभीर दुष्काळअकोला : अनियमित आणि सरासरीपेक्षा कमी झालेल्या...
अमरावती जिल्ह्यातील ‘रब्बी`...अमरावती : कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी १ लाख ६८...
विषाणूंपासून मधमाश्यांच्या बचावासाठी...अळिंबीचा अर्क मधमाश्यांना खाद्यामध्ये दिल्यास...
संकरित कपाशीचे ‘नांदेड ४४’ वाण...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने...
सांगली जिल्ह्यातील सर्वच तलाव आटलेसांगली ः ताकारी, टेंभू, आरफळ योजनेच्या पाण्यामुळे...
पुणे विभागात अवघ्या सहा टक्के पेरण्यापुणे ः पावसाळ्यात पडलेल्या पावसाच्या खंडाचा...
पाऊस नसताच आला तं पुरला असताखर्च गंज झाला एक लाख रुपये, कापूस झाला साडेतीन क्...
साताऱ्यात गाळप हंगामाची तयारी अंतिम...सातारा ः ऊस गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात...
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंमल...अकोला ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील परिषदेनंतर...
सदोष वितरणामुळेच विजेचे संकट : शर्मानाशिक : राज्यातच नव्हे तर देशभरात कोळशाचा साठा...
राज्यात दुष्काळसदृश नाही, तर दुष्काळ...मुंबई : यंदा झालेल्या कमी पावसामुळे राज्याच्या...
..या १८० तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती...मुंबई ः पावसाने मोठी ओढ दिल्याने निर्माण झालेल्या...
भूषा विकासापासून कोसो दूरभूषा , जि. नंदुरबार ः दिवस सोमवारचा (ता. १ ऑक्‍...
निर्यातीसाठी साखर देण्यास बॅंकांचा नकारपुणे : साखर निर्यातीसाठी केंद्र सरकारने पॅकेज...
बाजारात अफवा पसरवून कांदादर पाडण्याचा...नाशिक : दसऱ्यानंतर कांदा बाजारात क्विंटलला चार...
राज्याच्या दक्षिण भागात हलक्या पावसाची...पुणे : महाराष्ट्रात असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा...
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...