agriculture news in marathi, 165 crore deposits in Sangli for loan waiver | Agrowon

सांगलीत कर्जमाफीचे १६५ कोटी वर्ग
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाचे मंगळवारअखेर ६४ हजार १०५ शेतकऱ्यांच्या खात्यावर १६५ कोटी रुपये वर्ग केले आहेत. जिल्हा बॅंकेला दोन दिवसांपूर्वी प्रोत्साहन अनुदानाचे ३६ कोटी रुपये आले आहेत. सुमारे २५ हजार शेतकऱ्यांची कर्जखाती निल झाली असून, ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रोत्साहन अनुदान वर्ग झाले आहे.

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाचे मंगळवारअखेर ६४ हजार १०५ शेतकऱ्यांच्या खात्यावर १६५ कोटी रुपये वर्ग केले आहेत. जिल्हा बॅंकेला दोन दिवसांपूर्वी प्रोत्साहन अनुदानाचे ३६ कोटी रुपये आले आहेत. सुमारे २५ हजार शेतकऱ्यांची कर्जखाती निल झाली असून, ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रोत्साहन अनुदान वर्ग झाले आहे.

कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी जिल्ह्यात तीन टप्प्यांत ८९ हजार ७९० पात्र शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट जिल्हा बॅंकेच्या लॉग इनवर आली आहे. यामध्ये कर्जमाफीस पात्र दीड लाखापर्यंतचे थकबाकीदार शेतकरी २४ हजार १६० आहेत. त्यांच्या कर्जमाफीची रक्कम ८९.६८ कोटी रुपये आहे.

५९ हजार ८९८ शेतकरी प्रोत्साहन अनुदानास पात्र आहेत. त्यांची रक्कम ९०.९१ कोटी रुपये आहे. ओटीएससाठी (वनटाइम सेटलमेंट) ५ हजार ७३९ शेतकरी पात्र आहेत. त्यांनी दीड लाखावरील रक्कम ३१ मार्च २०१८ पर्यंत भरल्यास ३९.४२ कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. तीन टप्प्यांतील यादीनुसार कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएस लाभाची रक्कम २२० कोटी रुपये आहे.

त्यापैकी जिल्हा बॅंकेला १७७ कोटी ३८ लाख रुपये मिळाले आहेत. त्यापैकी मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ६० हजार ६६८ शेतकऱ्यांचे १३८ कोटी रुपये जिल्हा बॅंकेने वर्ग केले आहेत.

जिल्हा बॅंक मुख्यालय व शाखा स्तरावर रात्री उशिरापर्यंत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाची रक्कम वर्ग करण्याचे काम सुरू होते. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर कर्जमाफी अंमलबजावणीबाबत सतत देखरेख ठेवून आहेत. कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र-अपात्रचे निकष शासनाने ठरवून दिलेले आहेत. पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन शासनाने केले होते.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...