agriculture news in marathi, 1,685 crore loan expenditure for Kharif | Agrowon

नाशिक जिल्ह्यात खरिपासाठी १,६८५ कोटींचे कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

नाशिक : अन्नधान्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, यासाठी यंदा बँका सरसावल्याचे सकारात्मक चित्र नाशिक जिल्ह्यात दिसू लागले आहे. चालू आर्थिक वर्षात २६२६ कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले असताना, एकट्या खरिपाच्या हंगामात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत १ हजार ६८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी ९८८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते.

नाशिक : अन्नधान्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, यासाठी यंदा बँका सरसावल्याचे सकारात्मक चित्र नाशिक जिल्ह्यात दिसू लागले आहे. चालू आर्थिक वर्षात २६२६ कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले असताना, एकट्या खरिपाच्या हंगामात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत १ हजार ६८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी ९८८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नसल्यास त्यांना कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीमधून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना पेरणी, औषध फवारणी, पीक वाहतूक खर्च भागविण्यासाठी बँकांकडून कर्ज घेण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. परंतु, घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतकरी करू शकेल का, याबाबत बँकांना साशंकता असल्याने त्या कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. निकषांना पात्र ठरत असूनही बँकांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केली, तर आमच्याकडे तक्रारी करा, असे थेट आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्यानुसार, प्रशासनाला तक्रारीदेखील प्राप्त होऊ लागल्या आहेत.

तालुका पातळीवर तहसीलदारांनी या विषयात प्राधान्याने लक्ष घालावे, असे स्पष्ट निर्देश जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे यंत्रणा कामाला लागली. याबाबत तालुका स्तरावर मेळावे घेऊन त्यामध्ये बँकांनाही सहभागी करून घेण्यात आले. राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांनीही जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्ज वितरणाचा वेग वाढविला. खरिपात १६८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले असून, उद्दिष्ट प्राप्तीसाठी रब्बीमध्येही कर्जवाटप केले जाणार असल्याची माहिती मिळाली.

इतर बातम्या
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
सोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
आटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
कामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर  : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...