नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दर

नगरमध्ये कांद्याने ओलांडला सोळाशेचा टप्पा
नगरमध्ये कांद्याने ओलांडला सोळाशेचा टप्पा

नगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार समित्यांमध्ये ५७ हजार ९३७ कांदा गोण्यांची आवक झाली. मागणी वाढल्याने भावात वाढ झाली असून, कांद्याने रविवारी (ता. १४) सोळाशेचा टप्पा ओलांडला. राहाता बाजार समितीत क्रमांक एकच्या कांद्याच्या काही गोण्यांना २२०० रुपये दर मिळाला. जिल्ह्यातील पारनेर, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, कोपरगाव, अकोले बाजार समितीबरोबर तिसगाव उपबाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात या बाजार समित्यांमध्ये आवक कमी झाली.

परराज्यांतून चांगली मागणी असल्यामुळे कांद्याच्या भावात तेजी आली आहे. श्रीरामपूरमध्ये कांद्याची सर्वाधिक आवक झाली. श्रीरामपूरमध्ये २२ हजार, संगमनेरमध्ये ७ हजार ३०४, राहुरीत १० हजार ३१८, राहात्यात ८ हजार ६२६, पारनेरमध्ये ३ हजार ४१९, अकोल्यामध्ये ३ हजार, कोपरगावमध्ये २ हजार ८७० व तिसगावमध्ये ४०० कांदा गोण्यांची आवक झाली.

प्रतवारीनुसार दर असे ः राहाता ः क्रमांक एक ः १३०० ते २२००, दोन ः ७०० ते १२००, तीन ः २०० ते ६००, गोल्टी कांदा ः एक हजार ते ११००, जोड कांदा ः २०० ते ३००. संगमनेर ः क्रमांक एक ः १२०० ते १६००, दोन ः ८०० ते १२००, तीन ः ४०० ते ८००, गोल्टी कांदा ः १०० ते ७००,. राहुरी ः क्रमांक एक ः १२५० ते१५००, दोन ः ७०० ते १२४०, तीन ः २०० ते ६९०, गोल्टी कांदा ः ६०० ते एक हजार. अकोले ः क्रमांक एक ः १३०० ते १६००, दोन ः ९०० ते १३००, तीन ः ७०० ते ९००, गोल्टी कांदा ः ५०० ते ७००, खाद ः ४०० ते ४५०. पारनेर ः क्रमांक एक ः १५०० ते १७००, दोन ः एक हजार ते १५००, तीन ः ५०० ते एक हजार, जोड कांदा ः ३०० ते ४००. श्रीरामपूर ः क्रमांक एक ः ११०० ते १६००, दोन ः ७०० ते ९००, तीन ः २०० ते ५००, गोल्टी कांदा ६०० ते ९००. कोपरगाव ः क्रमांक एक ः ९५० ते १५००, दोन ः ७०० ते ९२५, तीन ः ४०० ते ८००, जोड कांदा ः २५० ते ४५०. तिसगाव (उपबाजार) ः क्रमांक एक ः १३०० ते ७००, दोन ः ९०० ते १५००, तीन ः ५०० ते ९००, गोल्टी कांदा ः ३०० ते ४००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com