तेलंगणातून १७ शेतमजुरांची सुटका

अकोला : पोलिसांनी सुटका केलेले शेतमजूर
अकोला : पोलिसांनी सुटका केलेले शेतमजूर

अकोला : कामाच्या शोधात तेलंगणामध्ये पोचलेल्या १७ शेतमजुरांना आठ दिवस हालअपेष्टा सहन केल्यानंतर पोलिसांच्या कामगिरीमुळे सुखररूप गावी परत येता आले. जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम व परिसरातील १७ मजुरांची पोलिसांनी सुटका करीत परत आणले. या शेतमजुरांना तेलंगणा राज्यातील मामाढगी गावातून सोडण्यात आले. जिल्ह्यातील माना पोलिसांनी मंगळवारी (ता. २६) तेलंगणा राज्यातून सुटका केली.

गावाकडे कामे नसल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील करुम व पापड या गावातील काही जण रोजंदारी मिळणार म्हणून यवतमाळच्या मधुकर चव्हाण नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून तेलंगणात गेले होते. यात एका महिलाही होती. मधुकर चव्हाण याने या शेतमजुरांना तेलंगणातील मामाढगी (जि. संघरेड्डी) गावातील येला रेड्डी नामक व्यक्तीच्या शेतात मजुरीसाठी ठेवले. उसाच्या शेतात दिवसभर राबल्यावर त्यांना मजुरी देण्याएवजी एका खोलीत डांबून मारहाण करण्यात आली.

दिवसभर काम अन् एकवेळचं जेवण, शिवाय मारहाण हा प्रकार रोजच सुरू होता. त्यातच भाषेचीही अडचण होती. यापैकी एका शेतमजुराने संधी साधून गावातील नातेवाइकाशी मोबाईलवरून संपर्क साधला. शेतमजुरांची आपबिती एकल्यावर थक्क झालेल्या नातेवाइकांनी थेट माना पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने बंदिस्त शेतमजुरांचा ठावठिकाणा लावला.

चव्हाण नामक एका व्यक्तीने ५०० रुपये मजुरी देतो असे सांगून तेलंगणात नेले होते. तेथे उसाच्या शेतात दिवसभर मजुरी केल्यावर केवळ एक वेळ जेवण मिळायचे. मजुरीचे पैसे तर दिलेच नाहीत. शिवाय एका खोलीत डांबून मारहाण केली जात असे. - सुधाकर सुखदेव इंगोले , शेतमजूर  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com