कर्नाटकात वाहून गेले १७ टीएमसी पाणी

कर्नाटकात वाहून गेले १७ टीएमसी पाणी
कर्नाटकात वाहून गेले १७ टीएमसी पाणी

लातूर ः दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यावर पावसाची चांगली कृपा राहिली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी मांजरा धरण भरले आहे. लातूरच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला, तरी धरणातून जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे १७ टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे.

गेल्या वर्षी मोठा पाऊस झाला होता. त्यात १२१ टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले होते. त्यामुळे या पाण्याचे योग्य नियोजन करून वाहून जाणारे पाणी वाचवता आले तर त्याचा जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने मांजरा व तेरणा या दोन नद्या महत्त्वाच्या आहेत.

गेल्या वर्षी मोठा पाऊस झाल्याने १२१ टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले होते. या वर्षी शंभर टक्के पाऊस झाला नसला, तरी १७ टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. यात मांजरा नदीतून ४५० दशलक्ष घनमीटर, तर तेरणा नदीतून ४० दशलक्षघनमीटर पाणी वाहून गेले आहे.

मांजरा धरणाचे नियोजन हवे लातूरला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण गेल्या वर्षी शंभर टक्के भरले होते; पण सात ते आठ महिन्यांत या धरणातील ७५ टक्के पाण्याचा उपसा झाला. या वर्षी परतीच्या पावसाने साथ दिल्याने पुन्हा हे धरण शंभर गेले. या धरणाची साठवण क्षमता २५०.७० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या उपशावर नियंत्रणाची गरज आहे.

कालव्यातून ‘झुळझुळ’ पाणी या वर्षी मांजरा धरण भरले. सहा दरवाजे उघडे करून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. या धरणाचा उजवा कालवा ७८ किलोमीटर, तर डावा कालवा हा ९० किलोमीटर लांबीचा आहे. धरण भरल्यानंतर या कालव्यातून पाणी सोडण्याची गरज होती. पण बरेच पाणी नदीत सोडून दिल्यानंतर तीन दिवस एक घनमीटर प्रतिसेकंद याप्रमाणे कालव्यात पाणी सोडण्यात आले.

या कालव्याची व्यवस्थित दुरुस्ती नाही, शेतात पाणी जाते असे सांगून पाणी सोडले गेले नाही. हे पाणी सोडले गेले असते, तर कालवे भरून राहिले असते. परिसरातील विहिरीची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली असती.

पूर्ण क्षमतेने बॅरेजेस कधी भरणार? मांजरा नदीवर ११ बॅरेजेस बांधण्यात आले आहेत. पण शेतकऱ्यांचा ६६ कोटींचा मावेजा न दिल्याने हे बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरलेच जात नाहीत. हे बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले गेले, तर किमान दहा टीएमसी पाणीसाठा यात होणार आहे. पण शासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नागझरी पॅटर्न राबवण्याची गरज मांजरा नदीवर गेल्या वर्षी लोकसहभागातून नागझरी बॅरेजेसच्या परिसरात १८ किलोमीटर नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. त्यातून एक टीएमसी पाणीसाठा क्षमता वाढली. सध्या जलयुक्त शिवार राबवले जात आहे. जिल्ह्यात १४७ किलोमीटर मांजरा नदीचे पात्र आहे. शासनाने जलयुक्त शिवार हे अभियान या नदीत राबवले, तर कर्नाटकात वाहून जाणारे पाणी वाचवण्यास मदत होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com