agriculture news in marathi, In 17 years 26 thousand farmers committed suicide in maharashtra | Agrowon

राज्यात सतरा वर्षांत २६ हजार शेतकरी आत्महत्या
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 डिसेंबर 2017

नागपूर : नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कर्जवसुलीचा तगादा या कारणांमुळे गेल्या सतरा वर्षांत राज्यात २६ हजार ३३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. त्यापैकी १२ हजार ८०५ पात्र प्रकरणात संबंधित कुटुंबीयांना राज्य सरकारने एक लाख रुपयांची मदत दिली. मात्र, १३ हजार ५३४ प्रकरणे अपात्र ठरल्याने त्यांना मदत नाकारल्याची माहिती महसूल, मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

नागपूर : नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कर्जवसुलीचा तगादा या कारणांमुळे गेल्या सतरा वर्षांत राज्यात २६ हजार ३३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. त्यापैकी १२ हजार ८०५ पात्र प्रकरणात संबंधित कुटुंबीयांना राज्य सरकारने एक लाख रुपयांची मदत दिली. मात्र, १३ हजार ५३४ प्रकरणे अपात्र ठरल्याने त्यांना मदत नाकारल्याची माहिती महसूल, मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यासह विधानसभेतील आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला सरकारने लेखी उत्तर दिले. राज्यात पावसाने ओढ दिल्याने येणारी नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे राज्यात आतापर्यंत सुमारे ५० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने सांगितल्याचे निदर्शनाला आले. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचा शासाने निर्णय घेतला आहे का यासोबत आणखी काही प्रश्न आमदारांकडून करण्यात आले होते.

या संदर्भातील लेखी उत्तरात मंत्री पाटील यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कर्जवसुलीचा तगादा या कारणांमुळे गेल्या सतरा वर्षांत राज्यात २६ हजार ३३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले. तसेच १२ हजार ८०५ पात्र प्रकरणात संबंधित कुटुंबीयांना राज्य सरकारने एक लाख रुपयांची मदत दिली आहे. १ जानेवारी ते १५ ऑगस्ट २०१७ अखेर मराठवाड्यात ५८० तसेच बीडमध्ये ११५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मराठवाड्यात या वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने पिके जोमदार आली. पण जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी ५ लाख ७९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके करपून गेली आहेत. तसेच दुबार पेरणी न करता आल्याने शेतकऱ्यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचे निदर्शनाला आले असल्याबाबत विचारणा केलेल्या प्रश्नाला मंत्र्यांनी नाही असे उत्तर दिले आहे. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब व गट-क पदांच्या भरती प्रक्रियेत जर उमेदवारांनी समान गुण मिळाले तर प्राधान्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा समावेश करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...