agriculture news in marathi, 172 cases of direct negotiation of land acquisition in Solapur | Agrowon

सोलापुरात थेट वाटाघाटीची भूसंपादनाची १७२ प्रकरणे निकाली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 जुलै 2018
सोलापूर : जानेवारी २०१७ मध्ये सरकारने भूसंपादनाचा नवा निर्णय जाहीर केला. त्यानुसार शेतकऱ्यांना संबंधित भूसंपादनाचा मोबदला थेट वाटाघाटीद्वारे दिला जातोय. आतापर्यंत जिल्ह्यातील १७२ प्रकरणांना नव्या निर्णयानुसार मंजुरी मिळाली आहे. त्याचा ४ हजार २३ शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याची माहिती भूसंपादन कार्यालयाकडून देण्यात आली.
सोलापूर : जानेवारी २०१७ मध्ये सरकारने भूसंपादनाचा नवा निर्णय जाहीर केला. त्यानुसार शेतकऱ्यांना संबंधित भूसंपादनाचा मोबदला थेट वाटाघाटीद्वारे दिला जातोय. आतापर्यंत जिल्ह्यातील १७२ प्रकरणांना नव्या निर्णयानुसार मंजुरी मिळाली आहे. त्याचा ४ हजार २३ शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याची माहिती भूसंपादन कार्यालयाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाझर तलाव, कालवे, राष्ट्रीय व राज्य महामार्ग यांसह अन्य विविध कामांसाठी जमिनी संपादित करण्यात आल्या. तसेच काही ठिकाणी बाजारभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून भूसंपादनाला टोकाचा विरोध झाला. त्यामुळे अनेक प्रकल्पांची कामे रखडतात आणि त्यामुळे त्याची किंमत भविष्यात वाढते. त्यातून कायमस्वरूपी मार्ग काढण्याकरिता आता शेतकऱ्यांना थेट वाटाघाटीद्वारे मोबदला मिळत असल्याने बहुतांश प्रमाणात होणारा विरोध कमी झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय समितीमार्फत संबंधित जमिनीचा दर निश्‍चित करून तो संबंधित शेतकऱ्याला दिला जातो. त्यानुसार भूसंपादन कार्यालय क्रमांक एकअंतर्गत बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्‍यातील २१, क्रमांक तीन अंतर्गत बार्शी, मंगळवेढा व पंढरपूर तालुक्‍यातील ११, मोहोळ तालुक्‍यातील  ४७, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील १२, माढा व करमाळ्यातील ३७, माळशिरसमधील एक आणि मंगळवेढ्यातील ४३ प्रकरणांचा निपटारा थेट वाटाघाटीद्वारे करण्यात आल्याची माहिती भूसंपादन अधिकारी प्रवीण साळुंखे यांनी दिली.
भूसंपादन प्रकरणे १७२
संपादित एकूण क्षेत्र १०७७.३९ हेक्‍टर
शेतकरी संख्या ४,०२३

इतर बातम्या
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
हृदयासाठी आरोग्यवर्धक पदार्थांतून सोया...अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने हृदयासाठी...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
लातूर :थकित पैशांसाठी अडत्यांचे उपोषणलातूर : लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजर...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...