agriculture news in marathi, 18 sugar factories to run in pune district for season, Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात गाळपासाठी १८ साखर कारखाने सज्ज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास १८ साखर कारखाने सज्ज झाले आहेत. या साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात ८१ लाख मेट्रिक टन साखरेचे गाळप करण्याचे नियोजन केले असल्याचे साखर कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास १८ साखर कारखाने सज्ज झाले आहेत. या साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात ८१ लाख मेट्रिक टन साखरेचे गाळप करण्याचे नियोजन केले असल्याचे साखर कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टरवर उसाच्या लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे एक लाख १३ हजार १४० हेक्टरवरील ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. चालू वर्षी उसाचे सुमारे ८१ लाख टन गाळप होणे अपेक्षित असून ९० लाख मेट्रिक टन साखर तयार होईल.

जिल्ह्यात जवळपास १८ साखर कारखाने असून हे सर्व कारखाने गाळपासाठी पुढाकार घेण्याचा अंदाज आहे. शासनाने एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या एक नोंव्हेबरपासून कारखाने सुरू होणार आहेत. त्यासाठी लागणारे तोडणी मजूर कारखाना स्थळावर दाखल होत असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात कारखान्यांना साखर आयुक्त स्तरावरून अधिकृत परवाने दिल्यानंतर कारखाने सुरू होणार आहेत. त्यासाठी लागणारे परवाने साखर आयुक्त स्तरावरून ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक, दोन दिवसांत कारखान्यांना ऑनलाइन परवाने दिल्यानंतर सर्व कारखाने बुधवार (ता.१) पासून सुरू होण्याचा अंदाज आहे. 

इतर ताज्या घडामोडी
कोबीवरील भुरी, घाण्या रोगनियंत्रणराज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट...
अधिक उत्पादन, साखर उताऱ्यासाठी फुले १०,...ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या...
स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे...नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता...
नाशिक विभाग ‘मनरेगा’ची मजुरी जमा...नाशिक  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठासेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस,...
बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात...
परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर...परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत...
जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर...जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही...
कर्जमाफीच्या २१ लाख शेतकऱ्यांचे खाते '...यवतमाळ : कर्जमाफी अंतिम टप्प्यात आली आहे....
नगर जिल्ह्यात `नरेगा’च्या कामांवर...नगर : मजुरांना रोजगार मिळावा म्हणून राबवल्या...
वऱ्हाडात कांदा बिजोत्पादनाला गारपिटीचा...अकोला ः कांदा बिजोत्पादनाचे मोठे क्षेत्र असणाऱ्या...
हमीभाव : धूळफेकीचे चक्र पूर्ण सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने सत्तेवर...
सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी :...दीडपट हमीभावाची सरकारची घोषणा ही शुद्ध बनवाबनवी...
उत्पादन खर्चाबद्दल खुलासा करावा : डॉ....केंद्र सरकारने आगामी खरिपात सर्व अघोषित पिकांसाठी...
मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या...
गारपीटग्रस्त केळी बाग सुधारणेच्या...अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे  केळी पिकाचे कमी-...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात...जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा...
ब्रॉयलर्स बाजार दहा रुपयांनी उसळला,...ब्रॉयलर्सचा बाजार अपेक्षेप्रमाणे जोरदार उसळी...
पुण्यात कलिंगड, खरबुजाच्या आवकेत वाढपुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये...