नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हमीभावासाठी १८ हजार नोंदणी

हमीभावासाठी १८ हजार ४५७ शेतकऱ्यांची नोंदणी
हमीभावासाठी १८ हजार ४५७ शेतकऱ्यांची नोंदणी

नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील नाफेड आणि विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या मिळून २३ खरेदी केंद्रांवर एकूण १८ हजार ४५७ शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन या शेतीमालाच्या विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे.

विदर्भ मार्केटिंग फेडरशेनच्या परभणी जिल्ह्यातील दोन केंद्रावर २८८ शेतकऱ्यांचा ५९० क्विंटल मूग आणि नांदेड जिल्ह्यातील एका केंद्रांवर १२ शेतकऱ्यांचा ३५.२० क्विंटल उडीद खरेदी झाला. नाफेडच्या नांदेड जिल्ह्यातील दोन केंद्रांवर मूग खरेदी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परभणी, हिंगोली जिल्ह्यात नाफेडची खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु खरेदी सुरू झालेली नाही. सद्यःस्थितीत सोयाबीनचे बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

गुरुवार (ता. १५)पर्यंत नांदेड जिल्ह्यात नांदेड परभणी, हिंगोली जिल्ह्यांत नाफेडच्या २० आणि विदर्भ को. आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनाच्या ३ अशा एकूण २३ खरेदी केंद्रांवर मुगासाठी ५ हजार ५६२ शेतकऱ्यांनी, उडदासाठी २ हजार ६४७ शेतकऱ्यांनी, सोयाबीनसाठी १० हजार २४८ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुखेड, देगलूर, बिलोली, नायगाव, उमरी, भोकर, हदगाव, किनवट या नऊ ठिकाणी नाफेडची, तर धर्माबाद येथे खरेदी केंद्र आहे. यापैकी नायगाव आणि भोकर वगळता अन्य आठ केंद्रांवर मुगासाठी १ हजार ७९ शेतकऱ्यांनी, उडदासाठी १ हजार ७८० शेतकऱ्यांनी, सोयाबीनसाठी १ हजार ४११ शेतकऱ्यांनी असे एकूण ४ हजार २७० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. धर्माबाद येथील केंद्रांवर १२ शेतकऱ्यांना ३५.२० क्विंटल उडीद खरेदी झाला.

परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, पालम, पूर्णा या सहा ठिकाणी नाफेडची, तर मानवत आणि गंगाखेड येथे विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनची खरेदी केंद्र आहेत. या आठ केंद्रांवर मुगासाठी ३ हजार ८८० शेतकऱ्यांनी, उडदासाठी ३२१ शेतकऱ्यांनी, सोयाबीनसाठी ६ हजार ५०३ शेतकऱ्यांनी असे एकूण १० हजार ७०४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मानवत येथील केंद्रावर १३९ शेतकऱ्यांना ३०४.७६ क्विंटल मूग आणि गंगाखेड येथील केंद्रावर २८६.८० क्विंटल मूग असे एकूण २८८ शेतकऱ्यांच्या ५९०.५० क्विंटल मुगाची खरेदी झाली. अन्य केंद्रांवर खरेदी सुरू नाही.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळाबाजार, सेनगाव या पाच ठिकाणी नाफेडची खरेदी केंद्र आहेत. या केंद्रांवर एकूण ६०३ शेतकऱ्यांनी मुगासाठी, ५४६ शेतकऱ्यांनी उडदासाठी, २ हजार ३३४ शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी नोंदणी केली आहे. परंतु अद्याप खरेदी सुरू झालेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com