agriculture news in marathi, 18 thousand 457 farmers' registration for the guarantee rate | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हमीभावासाठी १८ हजार नोंदणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील नाफेड आणि विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या मिळून २३ खरेदी केंद्रांवर एकूण १८ हजार ४५७ शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन या शेतीमालाच्या विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे.

विदर्भ मार्केटिंग फेडरशेनच्या परभणी जिल्ह्यातील दोन केंद्रावर २८८ शेतकऱ्यांचा ५९० क्विंटल मूग आणि नांदेड जिल्ह्यातील एका केंद्रांवर १२ शेतकऱ्यांचा ३५.२० क्विंटल उडीद खरेदी झाला. नाफेडच्या नांदेड जिल्ह्यातील दोन केंद्रांवर मूग खरेदी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील नाफेड आणि विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या मिळून २३ खरेदी केंद्रांवर एकूण १८ हजार ४५७ शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन या शेतीमालाच्या विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे.

विदर्भ मार्केटिंग फेडरशेनच्या परभणी जिल्ह्यातील दोन केंद्रावर २८८ शेतकऱ्यांचा ५९० क्विंटल मूग आणि नांदेड जिल्ह्यातील एका केंद्रांवर १२ शेतकऱ्यांचा ३५.२० क्विंटल उडीद खरेदी झाला. नाफेडच्या नांदेड जिल्ह्यातील दोन केंद्रांवर मूग खरेदी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परभणी, हिंगोली जिल्ह्यात नाफेडची खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु खरेदी सुरू झालेली नाही. सद्यःस्थितीत सोयाबीनचे बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

गुरुवार (ता. १५)पर्यंत नांदेड जिल्ह्यात नांदेड परभणी, हिंगोली जिल्ह्यांत नाफेडच्या २० आणि विदर्भ को. आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनाच्या ३ अशा एकूण २३ खरेदी केंद्रांवर मुगासाठी ५ हजार ५६२ शेतकऱ्यांनी, उडदासाठी २ हजार ६४७ शेतकऱ्यांनी, सोयाबीनसाठी १० हजार २४८ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली.
नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुखेड, देगलूर, बिलोली, नायगाव, उमरी, भोकर, हदगाव, किनवट या नऊ ठिकाणी नाफेडची, तर धर्माबाद येथे खरेदी केंद्र आहे. यापैकी नायगाव आणि भोकर वगळता अन्य आठ केंद्रांवर मुगासाठी १ हजार ७९ शेतकऱ्यांनी, उडदासाठी १ हजार ७८० शेतकऱ्यांनी, सोयाबीनसाठी १ हजार ४११ शेतकऱ्यांनी असे एकूण ४ हजार २७० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. धर्माबाद येथील केंद्रांवर १२ शेतकऱ्यांना ३५.२० क्विंटल उडीद खरेदी झाला.

परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, पालम, पूर्णा या सहा ठिकाणी नाफेडची, तर मानवत आणि गंगाखेड येथे विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनची खरेदी केंद्र आहेत. या आठ केंद्रांवर मुगासाठी ३ हजार ८८० शेतकऱ्यांनी, उडदासाठी ३२१ शेतकऱ्यांनी, सोयाबीनसाठी ६ हजार ५०३ शेतकऱ्यांनी असे एकूण १० हजार ७०४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मानवत येथील केंद्रावर १३९ शेतकऱ्यांना ३०४.७६ क्विंटल मूग आणि गंगाखेड येथील केंद्रावर २८६.८० क्विंटल मूग असे एकूण २८८ शेतकऱ्यांच्या ५९०.५० क्विंटल मुगाची खरेदी झाली. अन्य केंद्रांवर खरेदी सुरू नाही.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळाबाजार, सेनगाव या पाच ठिकाणी नाफेडची खरेदी केंद्र आहेत. या केंद्रांवर एकूण ६०३ शेतकऱ्यांनी मुगासाठी, ५४६ शेतकऱ्यांनी उडदासाठी, २ हजार ३३४ शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी नोंदणी केली आहे. परंतु अद्याप खरेदी सुरू झालेली नाही.

 

इतर बातम्या
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष...वाळवा, जि. सांगली : ‘‘स्वबळावर उत्पादन क्षमता...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची...वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या...
अंकलगी तलाव आटू लागलासांगली : जत पूर्व भागातील ४१ गावांना पाणीपुरवठा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त...औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'नाशिक : नाशिक शहरातील हिरकणी अटल अभिनव सहकारी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
नगर : चार छावण्यांची परवानगी रद्दनगर : पशुधन वाचविण्यासाठी छावणीला मंजुरी...
औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...