agriculture news in Marathi, 18 thousand ton banana export to gulf countries, Maharashtra | Agrowon

आखातात १८ हजार टन केळी निर्यात
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 21 मे 2019

केळीची जळगाव व नंदुरबार आणि सोलापुरातून प्रतिदिन २० ते २२ कंटेनर निर्यात आखाती राष्ट्रांमध्ये सुरू आहे. आखातातून केळीला मागणी  कायम असून, दरही या हंगामात वाढले आहेत. सध्या केळीसंबंधी चित्र चांगले आहे. परंतु पुढे पाणीटंचाईमुळे आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील केळी लागवड घटल्याने केळीचा तुटवडा भासणार असून दर मात्र टिकून राहतील.
- के. बी. पाटील, केळीतज्ज्ञ

जळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५ कंटेनर (एक कंटेनर २० मेट्रिक टन क्षमता) याप्रमाणे सुमारे १८ हजार मेट्रिक टन केळीची आखाती देशांमध्ये निर्यात झाली आहे. सध्या आखाती राष्ट्रांमध्ये सरासरी प्रतिदिन २० ते २२ कंटेनर केळी निर्यात होत आहे. रमजानमुळे देशांतर्गत बाजारातही केळीचा उठाव वाढला असून, दरांवरील दबाव दूर झाला आहे. यातच पाणीटंचाईमुळे महाराष्ट्र व आंध्र प्रदेशात मिळून सुमारे १० ते ११ हजार हेक्‍टरने केळी लागवड घटल्याचा अंदाज आहे. 

महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, गुजरात, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातील केळीची काढणी जून, जुलैच्या सुरवातीपर्यंत पूर्ण होईल. यातच पाणीटंचाईमुळे आंध्र प्रदेशातील कडप्पा, कर्नूल, हजारीबाग, अनंतपूर या भागांत केळी लागवड कमी झाली आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्‍टरने केळी लागवड घटली आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात जुलै ते डिसेंबर यादरम्यान केळीचा तुटवडा भासू शकतो. जुलै-ऑगस्टमध्ये देशांतर्गत बाजारात केळीचे दर टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांची व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील केळीखालील क्षेत्र पाच हजार हेक्‍टरने घटून ८८ हजार हेक्‍टरवर येऊ शकते. आंध्र प्रदेशातील क्षेत्रही ६० ते ६५ हजार हेक्‍टरपर्यंत राहू शकते. थंडीने राज्यातील केळीला फटका बसला तर उष्णतेमुळे महाराष्ट्रसह, गुजरात, आंध्र प्रदेशातील केळीचे नुकसान होत आहे. यामुळे दर्जेदार केळी जुलैपासून पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाहीत. 

सध्या महाराष्ट्रातून केळीची प्रतिदिन २० ते २२ कंटेनर एवढी निर्यात आखातात होत आहे. रावेर (जि. जळगाव) येथून प्रतिदिन १० कंटेनर, शहादा (जि. नंदुरबार) येथून प्रतिदिन सहा कंटेनर आणि टेंभूर्णी (जि. सोलापूर) भागातून प्रतिदिन चार कंटेनर निर्यात होत आहे. निर्यातीच्या केळीचे दर मागील आठ ते दहा दिवसांत क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढले असून, सध्या कमाल १५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर रावेर, जळगाव, शहादा भागांतील केळी उत्पादकांना खरेदीदार देत आहेत.

जळगाव जिल्ह्यात १० आघाडीच्या केळी निर्यातदार कंपन्यांकडून निर्यात सुरू आहे. तर नंदुरबारमध्ये सहा कंपन्या केळी निर्यातीसाठी कार्यरत आहेत. आखातातून प्रतिदिन ३० ते ३५ कंटेनरची मागणी आहे. तेथील मोठ्या खरेदीदारांना फिलिपिन्समधून सध्या केळी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. देशात आंध्र प्रदेश वगळता गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून बऱ्यापैकी केळी उपलब्ध होत आहे, अशी माहिती मिळाली.  

मागणी कायम
देशांतर्गत बाजारात काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशातून खानदेशात केळीसंबंधी मागणी कायम आहे. फैजपूर (ता. यावल), सावदा (ता. रावेर), मुक्ताईनगर भागातून प्रतिदिन पाच ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळी काश्‍मिरात पाठवली जात आहेत. १३ व १६ किलो क्षमतेच्या बॉक्‍समध्ये पॅकिंग करून तेथे केळी पाठवली जात असून, या दर्जेदार केळीला प्रतिक्विंटल १३०० रुपयांपर्यंतचे दर थेट जागेवर शेतकऱ्यांना मिळत असल्याचे सांगण्यात आले.

 

इतर अॅग्रो विशेष
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...