देशभरातील १८० शेतकरी संघटना दिल्लीत धडकणार

देशभरातील 180 शेतकरी संघटना दिल्लीत धडकणार
देशभरातील 180 शेतकरी संघटना दिल्लीत धडकणार

पुणे : मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला देशभरातील १८० शेतकरी संघटना १० लाख शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीत धडक मारणार आहेत. यामध्ये स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सुमारे १० हजार शेतकरी जाणार असून राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा सहभागी होणार आहेत. लोकसभेच्या सदस्य संख्येइतक्‍या विधवांची प्रतिसंसद भरविण्यात येणार असून या संसदेत झालेला ठराव राष्ट्रपतींना सादर करण्यात येणार आहे. 

या संपूर्ण आंदोलनात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी महत्वाची भूमिका बजावत आहेत. राज्यातील इतर संघटनादेखील या मोर्चात सहभागी होणार असून राज्यातून किमान १५ हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. स्वाभीमानीच्यावतीने शेतकऱ्यांनी दोन रेल्वे गाड्या "बुक' केल्या आहेत. या दोन्ही गाड्या कोल्हापुरातून सुटणार आहेत. विमान आणि स्वत:च्या चारचाकी मोटीरींनी निघण्याची तयारीही काही शेतकऱ्यांनी केली आहे. 

या मोर्चाला देशभरातून १० लाख शेतकऱ्यांना एकत्र करण्याचा संकल्प या मोर्चाच्या संयोजन समितीने केला आहे. जयसिंयगपूर येथील ऊस परिषद यशस्वी झाल्यानंतर खासदार शेट्टी यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. त्यातच गेल्या वर्षीपेक्षा टनाला दोनशे रूपये राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर त्यात आणखी भर पडली आहे. देशभरातील शेतकरी संघटनांना एकत्र करण्यासाठी विविध राज्यांचा दौरा खासदार शेट्टी यांनी केला आहे. 

तीन महिन्यांपासून ही तयारी सुरू आहे. राज्यातून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राज्यभर दौरा करून दिल्लीच्या मोर्चाची तयारी केली आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा ही संघटनेची प्रमुख मागणी असून या मागणीसाठी दिल्ली शेतकऱ्यांची ताकद दाखवून देण्याचा या मोर्चाचा उद्देश आहे. दिल्लीतील आंदेलनाला उत्रत भारतातील राज्यातून नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे उत्तर भारताबरोबरच दक्षिण भारतातील शेतकऱ्यांनीही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी संयोजन समितीचे प्रयत्न आहेत. प्रत्येक राज्यातून येणाऱ्या रेल्वे तसेच जिथे येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणी स्वतंत्र रेल्वेचे नियोजन त्या-त्या राज्यातील संघटनेकडून होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com