agriculture news in Marathi, 18,000 farmers' application under Chief Minister solar farming scheme | Agrowon

नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी १८ हजार अर्ज
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत महावितरणच्या नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १७ हजार ९०१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. आजवर ३ हजार २११ शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले आहेत. त्यापैकी ३३४ लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिश्शाची रक्कम जमा केली आहे. या बाबत महावितरण कंपनीच्या सूत्रांनी माहिती दिली.

नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत महावितरणच्या नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १७ हजार ९०१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. आजवर ३ हजार २११ शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले आहेत. त्यापैकी ३३४ लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिश्शाची रक्कम जमा केली आहे. या बाबत महावितरण कंपनीच्या सूत्रांनी माहिती दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या हिश्शाची रकमेची मर्यादा कमी करण्यात आली आहे. तसेच महावितरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत वीजजोडणी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेत ऑनलाइन अर्ज करून सहभागी होता येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

शाश्वत जलस्रोत उपलब्ध असलेल्या, परंतु यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी न घेतलेल्या किंवा वीजजोडणीसाठी अनामत रक्कम भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे. सौर कृषिपंपासाठी राज्यभरातील सुमारे ६४ हजार ९३८ शेतकऱ्यांचे प्राप्त झाले असून, त्यापैकी १७ हजार १६ शेतकऱ्यांना कोटेशनही देण्यात आले आहेत. नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १७ हजार ९०१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. नांदेड जिल्ह्यातील ३ हजार ८१४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी ७४५ शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले आहे. यापैकी ३१ शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिश्शाची रक्कम भरलेली आहे. 

महावितरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांना केबलद्वारे वीजपुवठा देण्यात आला होता अशा शेतकऱ्यांची पायाभूत यंत्रणा उभारून कायमस्वरूपी वीजपुरवठा देण्याबाबत मागणी आल्याने त्यांनाही मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत ऑनलाइन अर्ज करून सहभागी करून घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

शासनाने मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मान्यता दिली. त्यानंतर या निविदेद्वारे निश्चित झालेली कृषिपंपाची किंमत ३ एचपी डीसीसाठी १ लाख ६५ हजार ५९४ रुपये आणि ५ एचपी डीसीसाठी २ लाख ४७  हजार १०६ रुपये एवढी आहे. ही रक्कम पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पूर्वी ३ एचपी डीसीपंपासाठी आधारभूत किंमत २ लाख ५५ हजार रुपये आणि ५ एचपीडीसी पंपासाठी ३ लाख ८५ हजार रुपये होती. 

सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३ एचपीसाठी २५ हजार ५०० रुपये, (दहा टक्के) तर अनुसूचित जाती, जमाती गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ७२५ रुपये एवढी रक्कम भरावी लागत होती. ती रक्कम आता अनुक्रमे १६ हजार ५६० रुपये आणि ८ हजार २८० रुपये एवढी भरावी लागणार आहे. तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३८ हजार ५०० रुपये (१० टक्के) तर अनुसूचित जाती, जमाती गटातील लाभार्थ्यांना १९ हजार २५० रुपये एवढी रक्कम भरावी लागत होती. ती रक्कम आता अनुक्रमे २४ हजार ७१० रुपये आणि १२ हजार ३५५ रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...