agriculture news in marathi, 186 applications for market committee | Agrowon

करमाळा बाजार समितीसाठी १८६ जणांचे अर्ज
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

करमाळा, जि. सोलापूर  : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्यासाठी सोमवारी (ता.१३) शेवटच्या दिवशी ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण १८ जागेसाठी एकूण १८६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मारुती बोरकर यांनी दिली. पहिल्यांदाच करमाळा तालुक्‍यातील शेतकरी आपल्या पसंतीचे संचालक मंडळ निवडणार आहेत.

करमाळा, जि. सोलापूर  : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्यासाठी सोमवारी (ता.१३) शेवटच्या दिवशी ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण १८ जागेसाठी एकूण १८६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मारुती बोरकर यांनी दिली. पहिल्यांदाच करमाळा तालुक्‍यातील शेतकरी आपल्या पसंतीचे संचालक मंडळ निवडणार आहेत.

पणन विभागाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क मिळाल्यानंतर यापूर्वी जिल्ह्यात सोलापूर आणि बार्शी बाजार समितीसाठी निवडणूक झाली. आता करमाळ्यात त्यासाठी चुरस रंगणार आहे. आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप हे एकत्रितपणे तर माजी आमदार बागल गट आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे स्वतंत्रपणे अशी तिरंगी लढत शक्‍य आहे; पण आता भाजपही चौथे पॅनेल निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे समजते. पण हे सगळे चित्र उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी समजणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रमुख उमेदवार व गण :
माजी आमदार जयवंतराव जगताप (केम), ‘आदिनाथ''च्या संचालिका रश्‍मी बागल (रायगाव, पोथरे) ‘मकाई''चे अध्यक्ष दिग्विजय बागल (पोथरे, कंदर, वांगी), ‘आदिनाथ''चे माजी संचालक नवनाथ झोळ, चंद्रकांत सरडे, तानाजी झोळ (वाशिंबे), आमदार नारायण पाटील यांचे बंधू राजू पाटील, राजकुमार देशमुख, विलास पाटील (वांगी), देवानंद बागल (वीट, पोथरे), चिंतामणी जगताप, दीपक चव्हाण (हिसरे), प्रा. शिवाजीराव बंडगर (झरे), अजित तळेकर (केम), माजी सभापती बापूसाहेब पाटील, सूर्यकांत पाटील, बंडू टापरे (राजुरी), डॉ. अमोल घाडगे, सुनील सावंत (पोथरे), मधुकर गाडे, बिभिषण आवटे, डॉ. श्रीराम जाधव, रघुनाथ ढेरे, हनुमंत ढेरे, अण्णा शिंगाडे, कांतीलाल चोपडे, शहाजी माने (वीट), माजी उपसभापती संजय जाधव, महादेव श्रीखंडे, काशीनाथ काकडे, अप्पा शेरे (सावडी), दत्ता जाधव, वसंत आंबारे (साडे) आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. उद्या (मंगळवारी) उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले.

इतर बातम्या
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
उत्तर महाराष्ट्रात टंचाईच्या झळा तीव्रनाशिक : भूजल पातळीत वेगाने घट होत असल्याने उत्तर...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
‘वसाका`च्या गळीत हंगामास प्रारंभकळवण, जि. नाशिक : विठेवाडी येथील वसंतदादा पाटील...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
शेतीप्रश्नांसाठी तरुणांच्या चळवळीची गरज...वैराग, जि. सोलापूर : ‘‘शेतीचे प्रश्न वाढतायेत, ते...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...