बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय र
ताज्या घडामोडी
लातूर ः शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्यानंतर शासनाकडून वेळेवर पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे. लातूर जिल्ह्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे १९ कोटी ५० लाख रुपये शासनाकडे थकले आहेत. शासनाकडून पैसे उशिरा मिळत असल्याने शेतकरी हमीभावापेक्षा कमी भावात बाजारपेठेत तूर विक्रीलाच प्राधान्य देताना दिसत आहेत.
लातूर ः शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्यानंतर शासनाकडून वेळेवर पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे. लातूर जिल्ह्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे १९ कोटी ५० लाख रुपये शासनाकडे थकले आहेत. शासनाकडून पैसे उशिरा मिळत असल्याने शेतकरी हमीभावापेक्षा कमी भावात बाजारपेठेत तूर विक्रीलाच प्राधान्य देताना दिसत आहेत.
केंद्र शासनाने तुरीसाठी पाच हजार ४५० रुपये हमीभाव जाहीर केला. पण या वर्षी बाजारपेठेत हमी भावासारखे दरच तुरीला मिळाले नाहीत. त्यात शासनाने या वर्षी उशिरा तुरीची खरेदी केंद्र सुरू केले. जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. आॅनलाइन नोंदणीचा घोळ शासनाने सुरूच ठेवला.
तरीदेखील तुरीला हमीभाव तरी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी अनेक अडचणीला सामोरे जात आॅनलाइन नोंदणी केली.
यात आतापर्यंत ११ हजार ७९८ शेतकऱ्यांनी एक लाख २६ हजार १८९ क्विंटल तूर जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रावर विकली आहे. सुमारे ६८ कोटी ७७ लाख ३२ हजार ८८४ रुपयांची ही तूर आहे. खरे तर शासनाने तुरीची खरेदी केल्यानंतर आठ दिवसांत पेमेंट करणे अपेक्षित होते. पण महिनाभरातही पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत आठ हजार ६०३ शेतकऱ्यांना ४९ कोटी १९ लाख २० हजार ७७६ रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे. तीन हजार १९४ शेतकऱ्यांचे १९ कोटी ५८ लाख १२ हजार १०८ रुपये अद्यापही पेमेंट शासनाकडे शिल्लक आहे. हे पेमेंट कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
लातूर जिल्ह्यातील तूर खरेदी स्थिती
खरेंदी केंद्र | तूर खरेदी क्विंटलमध्ये | तूर दिलेल्या शेतकऱ्यांची संख्या | पैसे न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या |
लातूर | १०,८५१.९२ | ९९५ | ६० |
उदगीर | १७,५९७.४५ | १९२६ | ९९० |
अहमदपूर | २५,११७.०० | २२१८ | ४९१ |
निलंगा | ११,४२७.०० | ८८५ | १७४ |
औसा | १६,५३५.०९ | १४८३ | २६९ |
रेणापूर | १०,०१०.५० | ९०८ | १८३ |
देवणी | ११,७६७.४६ | ११२३ | २०६ |
चाकूर | १४,०९३.६० | १४२२ | ३१२ |
साकोळ | ३००२.५० | २८२ | ५१ |
जळकोट | ५७९६.०० | ५५६ | ४५८ |
एकूण | १,२६,१८९.५२ | ११,७९८ | ३१९४ |
- 1 of 346
- ››