agriculture news in Marathi, 193 sugar factories shuts crushing, Maharashtra | Agrowon

देशातील १९३ कारखान्यांची धुराडी बंद
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

नवी दिल्ली : देशात यंदाच्या हंगामात ५२४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. त्यापैकी आतापर्यंत १९३ कारखान्यांची धुराडी थंडावली असून, महाराष्ट्र आणि कर्नटकातील आणखी काही कारखाने येत्या काही दिवसांत गाळप थांबवतील, अशी माहिती ‘इस्मा’ने  दिली.

नवी दिल्ली : देशात यंदाच्या हंगामात ५२४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. त्यापैकी आतापर्यंत १९३ कारखान्यांची धुराडी थंडावली असून, महाराष्ट्र आणि कर्नटकातील आणखी काही कारखाने येत्या काही दिवसांत गाळप थांबवतील, अशी माहिती ‘इस्मा’ने  दिली.

यंदा देशात अधिक कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. कारखान्यांना गाळपासाठी ऊस उपलब्ध झाल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत मागील हंगामात १८.१९ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले होते. त्यात वाढ होऊन यंदा तब्बल २८.१८ दशलक्ष टन उत्पादन झाले आहे. साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्येही उत्पादन वाढले आहे. उत्तर प्रदेशात ९.५१ दशलक्ष टन, महाराष्ट्रात १०.१३ दशलक्ष टन आणि कर्नाटकात ३.५६ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले आहे, असेही ‘इस्मा’ने म्हटले आहे. 

देणी थकली
देशातील कारखान्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात गाळप केले. परंतु, दर पडल्याने मोठ्या प्रमाणात देणी थकली आहेत. ३१ मार्चपर्यंत देशातील साखर कारखान्यांकडे १६० ते १७० अब्ज रुपये उसाची देणी बाकी होती. महाराष्ट्रात जवळपास २५ अब्ज रुपये देणी बाकी आहेत. बाजारात साखरेचे दर वाढत नाहीत तोपर्यंत साखर कारखाने देणी देण्यास असमर्थ आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.     

दर पडलेलेच
साखर उत्पानात वाढ झाल्याने बाजारात आवक वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर होऊन सध्या देशात साखरेचे दर प्रतिक्विंटल ३००० रुपयांच्या आसपास घुटमळत आहेत. साखर कारखान्यांना ३५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्यास साखर उत्पादन करणे परवडेल आणि त्यांना शेतकऱ्यांची देणी वेळेवर देणे शक्य होईल. मात्र, सध्या बाजारात दर कमी असल्याने साखर कारखाने अडचणीत आले आहेत. 

निर्यात अनुदान अपुरे
देशातील वाढलेला साखरेचा पुरवठा कमी करण्यासाठी सरकारने निर्यात अनुदान देऊन या हंगामाच्या अखेरपर्यंत, सप्टेंबर महिन्यापर्यंत साखर कारखान्यांना दोन लाख टन निर्यात करण्यास सांगितले आहे. या निर्यात योजनेंतर्गत सर्व साखर कारखान्यांना सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार उत्पादनानुसार साखर निर्यात करायची आहे. यासाठी साखर कारखान्यांना प्रतिटन ३५० डॉलर निर्यात अनुदान मिळणार आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर आधीच पडलेले असताना, हे अनुदान अपुरे असल्याचे व्यापाऱ्यांचे व साखर कारखान्यांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...