agriculture news in marathi, 2 thousand 809 applications for personal benefit schemes are approved | Agrowon

वैयक्तिक लाभ योजनांचे २ हजार ८०९ अर्ज मंजूर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

पुणे : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून राबविण्यात येणारी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी दोन हजार ८०९ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. यातील अपात्र उमेदवारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी शुक्रवारपर्यंत (ता. ५) मुदत देण्यात आली आहे. तर प्रस्ताव मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना वस्तू खरेदीसाठी सूचना देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके यांनी दिली.

पुणे : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून राबविण्यात येणारी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी दोन हजार ८०९ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. यातील अपात्र उमेदवारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी शुक्रवारपर्यंत (ता. ५) मुदत देण्यात आली आहे. तर प्रस्ताव मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना वस्तू खरेदीसाठी सूचना देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके यांनी दिली.

ग्रामीण भागातील महिलांना घरबसल्या व्यवसाय करता यावा, तसेच व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून महिलांना व्यवसायाभिमुख वस्तू म्हणून शेवई मशिन, शेळी पालन आणि ब्युटीपार्लरचे साहित्य देण्यात येणार आहे. तसेच एमएससीआयटी झालेल्या मुलींना आणि बारावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलींना अनुदान देण्यात येणार आहे. त्यामध्ये शेवई मशिनसाठी ७७० लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, त्यामध्ये सर्वाधिक लाभार्थ्यांची संख्या इंदापूर, दौंड, जुन्नर भागांतील आहे.

शेळीपालन योजनेतून प्रत्येक लाभार्थ्याला दोन शेळी आणि एक बोकडसाठी अनुदान देण्यात येणार असून, त्यासाठी १ हजार २३७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक इंदापूरमध्ये ३८८ लाभार्थी आहेत. तसेच ब्युटीपार्लर साहित्यासाठी ३४३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. संगणक आणि विशेष प्रावीण्यासाठी प्रत्येकी ४०९ आणि ५० प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.

वैयक्तिक लाभाच्या योजनांमधून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून, निधीही वाढवण्यात आला आहे. तालुका आणि गावपातळीवर अधिकारी, सदस्य यांच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देऊन अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना अनुदान थेट लाभ पद्धतीने (डिबीटी) देण्यात येणार असून, बहुतांश विभागाचे काम अंतीम टप्प्यात अाहे.
- विश्‍वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे

इतर बातम्या
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटपपरभणी : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये...
गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणीनांदेड :नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ६५...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीतजळगाव : जिल्ह्यातील सुमारे ९३५ गावांच्या...
पाणीपुरवठ्यांच्या देयकासाठी दोन कोटीअकोला : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या...
सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेगसांगली : जिल्ह्यात हळदीच्या काढणीला प्रारंभ झाला...
अपुऱ्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा...धुळे : पुरेशी सदस्यसंख्या नसतानाही (कोरम)...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणीसांगली : जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटकातून...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्रीसोलापूर : पाणीटंचाई भासणाऱ्या गावातील...
व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य...सोलापूर : पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...