agriculture news in marathi, 20 to 25 quintals of onion stolen in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये २० ते २५ क्विंटल कांद्याची चोरी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

देवळा, जि. नाशिक : देवळा तालुक्यातील वरवंडी येथील पांडुरंग सुखदेव शिंदे यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास २० ते २५ क्विंटल रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

निर्यातमूल्य शून्य होताच कांदा भावात वाढ होत असून कांदा चोरी गेल्यानंतर शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे.

देवळा, जि. नाशिक : देवळा तालुक्यातील वरवंडी येथील पांडुरंग सुखदेव शिंदे यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास २० ते २५ क्विंटल रांगडा लाल कांदा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

निर्यातमूल्य शून्य होताच कांदा भावात वाढ होत असून कांदा चोरी गेल्यानंतर शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे.

देवळा तालुक्यातील वरवंडी येथील प्रगतिशील शेतकरी पांडुरंग सुखदेव शिंदे यांचा गावालगत मळा आहे. त्यांनी आपल्या शेतातील रांगडा लाल कांदा काढून शेतात एका ठिकाणी साठवून ठेवला होता. शिंदे बुधवारी (ता.७) बाजार समितीत हे कांदे विक्रीसाठी घेऊन जाणार होते. आज सकाळी ते आपल्या शेतावर गेले असता त्यांना कांदा चोरट्यांनी भरून नेल्याचे समजताच त्यांनी ही माहिती गावातील पोलिसपाटलांना दिली. आजच्या बाजारभावानुसार शिंदे यांचा सुमारे ५० हजार रुपयांचा कांदा होता.

या घटनेमुळे शेतकरीवर्ग भयभीत झाला असून, या घटनेचा पोलिसांनी छडा लावून कांदा चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या कांद्याला बऱ्यापैकी बाजारभाव असल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत आहेत, त्यात अशी घटना घडत असेल तर त्यांनी न्याय कोणाकडे मागावा, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.

यात्रेनिमित्त उमराणा बाजार समिती बंद
उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्थानिक यात्रेनिमित्त मंगळवार, दि. १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान सलग तीन दिवस कांदा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती संचालक मंडळाच्या व कांदा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सभापती राजेंद्र देवरे, सचिव नितीन जाधव यांनी दिली.

उमराणा येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असते. यानिमित्त कांदा मार्केट आठ दिवस बंद राहत होते. मात्र शेतकरी हिताचा निर्णय घेत फक्त तीन दिवस मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला आहे. तसेच भुसार मार्केटही (मका व इतर) दि. ९ ते १९ फेब्रुवारीदरम्यान बंद ठेवण्यात आले आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. केवळ १० ते १२ आणि १६ ते १८ फेब्रुवारी रोजी कांदा मार्केट सुरू राहील व १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती असल्याने त्या दिवशीही मार्केट बंद राहील, अशी माहिती सभापती राजेंद्र देवरे, कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, सचिव नितीन जाधव यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...