agriculture news in marathi, 20 lakh hectare affected by pink bollworm | Agrowon

गुलाबी बोंड अळीग्रस्त क्षेत्र वीस लाख हेक्टरवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

पुणे : राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झालेले क्षेत्र २० लाख हेक्टरच्या पुढे गेल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, क्षेत्र खूप जास्त असल्याने यात पंचनामा करणे, तसेच भरपाई देण्यासाठी कंपन्यांना सक्ती करणे अशक्य असल्याचे मत कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केले.

पुणे : राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झालेले क्षेत्र २० लाख हेक्टरच्या पुढे गेल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, क्षेत्र खूप जास्त असल्याने यात पंचनामा करणे, तसेच भरपाई देण्यासाठी कंपन्यांना सक्ती करणे अशक्य असल्याचे मत कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केले.

‘महाराष्ट्रात स्वतंत्र कापूस कायदा अस्तित्वात आहे. त्यात सदोष बियाण्यांमुळे नुकसान झाल्यास पंचनामा करणे व नुकसानग्रस्त शेतकऱ्याला कंपनीकडून भरपाई मिळवून देण्याची तरतूद आहे. मात्र, या कायद्यानुसार पंचनामे करणे किंवा भरपाईचा आदेश जारी करणे या दोन्ही बाबी कृषी खात्याच्या आवाक्यापलीकडे आहेत. त्यामुळे शासनाला भरपाईसाठी इतर मार्ग काढावे लागतील,’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस पेरा झाला आहे. त्यातील निम्मे पीक शेंदरी बोंड अळी व इतर रोगाने बाधित झाले आहे. सरासरी हेक्टरी दोन क्विंटलचे नुकसान झाल्याचे गृहीत धरले व कपाशीचा हमीभाव ४५०० रुपये गृहीत धरल्यास राज्यातील शेतकऱ्यांना किमान १८०० कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागेल. कंपन्यांना तसा आदेश देणे शक्य नाही, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

बियाणे कंपन्यांनी राज्यात यंदा १६० लाख बीटी बियाणे पाकिटांची विक्री केली आहे. प्रतिपाकीट ८०० रुपये किंमत गृहीत धरल्यास १२८० कोटी रुपयांचे बियाणे या कंपन्यांनी विकलेले आहे. बियाणे विक्री किमतीच्या तुलनेत नुकसान भरपाईची रक्कम मोठी असल्याने भरपाई देणे कंपन्यांना अशक्य राहील, असेही कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार राज्यातील १८ जिल्ह्यांमधील २० लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र बोंड अळीच्या तडाख्यात आले आहे. आतापर्यंत ८० हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरून दिलेले आहेत. मात्र, कायद्यानुसार क्षेत्रीय पाहणी फक्त २१०० शेतकऱ्यांची झाली आहे. क्षेत्र मोठे असल्यामुळे पंचनाम्याची कामे सुरू झाल्यास इतर कामांना वेळ मिळणार नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळवण्यापेक्षा राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी किंवा राज्य आपत्ती निवारण निधीतून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी भरपाई देण्याचा तोडगा काढावा, असा प्रस्ताव शासनाला दिला जाण्याची शक्यता आहे.

‘गेल्या वर्षी कापूस कायद्याचा आधार घेत सदोष बियाण्यांमुळे ११४ हेक्टरवरील पिकासाठी ३६ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश बियाणे कंपनीला दिले गेले होते. तसेच आदेश आता २० लाख हेक्टरच्या भरपाईसाठी कंपन्यांना देता येणार नाहीत असे सांगून, या प्रकरणातील अडचणी शासनाला कळविल्या जातील, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...