agriculture news in marathi, 20 million loan allocated under Shetmal Taran Yojana | Agrowon

शेतमाल तारण योजनेतून २० कोटी कर्ज वाटप
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 जानेवारी 2018

पुणे : पणन मंडळाच्या वतीने १९९० पासून बाजार समित्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या शेतमाल तारण याेजनेत यंदा विक्रमी शेतमाल तारण ठेवण्यात आला आहे. २३ जानेवारीअखेर १ लाख क्विंटलचा टप्पा पार करण्यात आला असून, या तारणावर २ हजार ५६५ शेतकऱ्यांना २० काेटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

पुणे : पणन मंडळाच्या वतीने १९९० पासून बाजार समित्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या शेतमाल तारण याेजनेत यंदा विक्रमी शेतमाल तारण ठेवण्यात आला आहे. २३ जानेवारीअखेर १ लाख क्विंटलचा टप्पा पार करण्यात आला असून, या तारणावर २ हजार ५६५ शेतकऱ्यांना २० काेटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

श्री. पवार म्हणाले, ‘‘पणन मंडळाच्या वतीने १९९० पासून शेतमाल तारण याेजना राबविण्यात येत आहे. मात्र या याेजनेला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र सध्या शेतकऱ्यांमध्ये बाजारभावांबाबत जागरूकता आणि व्यावहारिकता वाढत असून, बाजार समित्यांच्या गाेदामांमध्ये शेतमाल ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

यंदा २०१७-१८ या याेजनेतील एेतिहासिक टप्पा पार केला असून, एक लाख क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. या याेजनेत ३०७ पैकी ११५ बाजार समित्यांमध्ये शेतमाल तारणा याेजना कार्यान्वित आहे. यामध्ये प्रामुख्याने अन्नधान्यांच्या बाजार समित्यांचा समावेश आहे.’’

या याेजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख आणि पणन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांचा सातत्याने पाठपुरावा आणि आग्रह हाेता. बाजार समित्यांना प्राेत्साहन देण्यासाठी पणन मंडळाने पुरस्कारदेखील सुरू केले आहेत.

गेल्या वर्षी पुरस्कारांचे पहिलेच वर्ष हाेते. दिवसेंदिवस बाजार समित्यांची संख्या वाढत असून, शेतमाल तारणासाठीच्या पायाभूत सुविधांसाठी पणन मंडळाच्या वतीने कर्जदेखील दिले जात अाहे, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.

राज्यातील प्रमुख पाच बाजार समित्यांमधील चित्र

 बाजार समिती  शेतकरी संख्या  शेतमाल (क्विंटल)  तारण कर्जाची रक्कम
 अकाेला    २३९  १०,२६६.८५   २ काेटी ५८ लाख ७ हजार
 कारंजा    १६३  ८,६०९.१६  १ काेटी ७५ लाख ५८ हजार
 अरमाेरी  १२४  ७,६४४.७४   १ काेटी ७ लाख ८९ हजार
 लातूर  १०३  ६, ८८१.१२  १ काेटी ३८ लाख १४ हजार
 गाेंडपिंपरी  ८९  ३,४०५.७५    ५८ लाख ८२ हजार २९८

 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...