agriculture news in marathi, 20 percent discount on online transaction proposal , Pune | Agrowon

आॅनलाइन व्यवहार केल्यास २० टक्के सवलतीचा प्रस्ताव
गणेश कोरे
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे ः बाजार समित्यांमधून शेतमालाच्या हाेणाऱ्या आॅनलाइन लिलाव आणि शेतकऱ्यांना ई-पेमेंट करणाऱ्या अडते, व्यापारी, खरेदीदारांना बाजार शुल्कात २० टक्के सवलत देण्यात यावी. याबराेबरच पणन संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या एकल परवानाधारकांनादेखील बाजार समित्यांमधील खरेदी आॅनलाइन करणे अनिवार्य करावी, असा प्रस्ताव पणन मंडळाने पणन संचालनालयाकडे सादर केला आहे. 

पुणे ः बाजार समित्यांमधून शेतमालाच्या हाेणाऱ्या आॅनलाइन लिलाव आणि शेतकऱ्यांना ई-पेमेंट करणाऱ्या अडते, व्यापारी, खरेदीदारांना बाजार शुल्कात २० टक्के सवलत देण्यात यावी. याबराेबरच पणन संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या एकल परवानाधारकांनादेखील बाजार समित्यांमधील खरेदी आॅनलाइन करणे अनिवार्य करावी, असा प्रस्ताव पणन मंडळाने पणन संचालनालयाकडे सादर केला आहे. 

या विविध प्रस्तावांची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी ‘ॲग्राेवन’ला दिली. पवार म्हणाले, की शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र शासनाने ई नाम याेजना सर्व राज्यांना लागू केली आहे.
यानुसार महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांमध्ये शेतमालाची प्रवेशद्वारावरच संगणकीय नाेंदणी आणि आॅनलाइन लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही याेजना प्रभावीपणे राबविण्यासाठी बाजार समित्यांमधून शेतमालाची आॅनलाइन खरेदी करणाऱ्या अडते, व्यापारी आणि खरेदीदारांना बाजार शुल्कामध्ये २० टक्के सवलत देण्यात यावी, असा प्रस्ताव पणन संचालनालयाला देण्यात आला आहे. तसेच पणन संचालनालयाकडून देण्यात येणाऱ्या एकल परवानेधारकांना (सिंगल लायसन्स) खरेदी आॅनलाइन पद्धतीनेच करावी, अशी अट परवान्यामध्ये टाकावी आणि ई-नाम राबविण्यात येणाऱ्या ३० बाजार समित्यांमधील अडत्यांंच्या परवाना नुतनीकरणासाठी ई-लिलाव आणि ई-पेमेंटची अट टाकण्यात यावी, अशा तीन मागण्यांचा प्रस्ताव सादर केला आहे.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
पुढील महिन्यापासून ‘समृद्धी’चे काम... वाशीम : नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती...
‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी... बीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत...
शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरताअमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन...
राज्यात ‘जलयुक्त’साठी २०८ कोटींचा निधीनगर ः दुष्काळमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या...
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...