agriculture news in marathi, 20 quintals of soybean production in Varanga | Agrowon

वारंगा येथे हेक्‍टरी २० क्विंटल सोयाबीन उत्पादनाचा निष्कर्ष
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

नागपूर : खरीप हंगामामध्ये विविध पिकांच्या उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी कृषी व महसूल विभागातर्फे वर्धा रोडवरील वारंगा गावातील व्यंकेटश येरले यांच्या शेतातील सोयाबीन प्लॉटवर पीक कापणी प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात हेक्‍टरी २० क्विंटल सोयाबीन उत्पादनाचा निष्कर्ष काढण्यात आला.

नागपूर : खरीप हंगामामध्ये विविध पिकांच्या उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी कृषी व महसूल विभागातर्फे वर्धा रोडवरील वारंगा गावातील व्यंकेटश येरले यांच्या शेतातील सोयाबीन प्लॉटवर पीक कापणी प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात हेक्‍टरी २० क्विंटल सोयाबीन उत्पादनाचा निष्कर्ष काढण्यात आला.

कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रयोग करण्यात आला. शेतातील सोयाबीन पिकाच्या १० बाय ५ मीटर क्षेत्रातील १६० नंबरच्या प्लॉटवर पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. सरळमिसळ पद्धतीने निवडण्यात आलेल्या सोयाबीनच्या प्लॉटवरील पिकांची कापणी करून प्रत्यक्ष सोयाबीन उत्पादनाची मोजणी करण्यात आली. या मोजणीमध्ये साधारणत: अर्ध्या गुठ्यात १० किलो सोयाबीनचे उत्पादन प्रात्यक्षिकामध्ये दिसून आले. त्यामुळे या परिसरातील शेतामध्ये हेक्‍टरी २० क्विंटल उत्पादनाचा सरासरी अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यातील विविध पिकांच्या उत्पादनासंदर्भातील प्रत्यक्ष शेतात निवड केलेल्या प्लॉटवर पीक कापणी प्रयोग राबविला जातो. यामध्ये कापूस, तूर, भात, सोयाबीन आदी पिकांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकाच्या पीक कापणी प्रयोगासाठी २२८ प्लॉटवर पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत आहे. कृषी, महसूल तसेच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कापणी अहवालानुसार उत्पादन ठरविण्यात येते. यावर्षी सोयाबीन पिकांच्या कापणी अहवालामध्ये हेक्‍टरी उत्पादनानुसार जिल्ह्याच्या विविध भागांतील अंदाज घेण्यात येत आहे. या प्रात्यक्षिकासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित
राहून पीक कापणी प्रयोग करावा, असे निर्देशही कृषी आयुक्तांनी  या वेळी दिले. कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे या वेळी उपस्थित होते.

‘कापसावरील बोंड अळी नियंत्रणात’
वारंगा परिसरातील कापसाच्या पिकाची पाहणी कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन केली. तसेच शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधला. शेतकऱ्यांनी बीजी-२ हे कापसाचे वाण घेतल्यामुळे बोंड अळीला सुद्धा प्रतिबंध असून शेतकऱ्यांनी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जानेवारी अथवा फेब्रुवारीपर्यंत कापसाची वेचणी करून त्यानंतर शेतातील कापूस नष्ट करावा तसेच फरदडचे पीक घेऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...