agriculture news in marathi, 20 thousand account holders are debt-free | Agrowon

अकोला, वाशीम जिल्ह्यातील २० हजार खातेदार कर्जमुक्त
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017
अकोला ः अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अखत्यारीत असलेल्या अकोला व वाशीम जिल्‍ह्यातील सुमारे २० हजार सभासद शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अातापर्यंत लाभ देण्यात अाल्याची माहिती मिळाली.
 
शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने शेतकऱ्यांची ‘ग्रीन यादी’ उपलब्ध करून दिल्यानंतर त्यामधील उपरोक्त शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. या शेतकऱ्यांचे कर्जखाते कर्जमुक्त करण्यासाठी प्रक्रिया वेगाने राबवली जात अाहे.
 
अकोला ः अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अखत्यारीत असलेल्या अकोला व वाशीम जिल्‍ह्यातील सुमारे २० हजार सभासद शेतकऱ्यांना कर्जमाफीचा अातापर्यंत लाभ देण्यात अाल्याची माहिती मिळाली.
 
शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने शेतकऱ्यांची ‘ग्रीन यादी’ उपलब्ध करून दिल्यानंतर त्यामधील उपरोक्त शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. या शेतकऱ्यांचे कर्जखाते कर्जमुक्त करण्यासाठी प्रक्रिया वेगाने राबवली जात अाहे.
 
कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अात्महत्या सातत्याने होत अाहेत. त्यातच शेतीमालाची उत्पादकता घटणे, भाव न मिळणे असे प्रकार होत अाहेत. यावरून विरोधकांनी सर्वत्र रान उठविल्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजनेअंतर्गत कर्जमाफी घोषित केली.
 
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी अाॅनलाइन अर्ज मागविण्यात अाले होते. या शेतकऱ्यांच्या अर्जांची छाननी केल्यानंतर याद्या अापले सरकार पोर्टलवर अपलोड करण्यात अाल्या होत्या. याद्यांमधील नावे माहिती तंत्रज्ञान विभागाने विविध पातळ्यांवर तपासून त्यानंतर त्यास अंतिम मान्यता देण्यात अाली. त्यानुसार जाहीर झालेल्या ग्रीन यादीतील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात अाली.   
 
‘ग्रीन यादी’त समावेश असलेल्या शेतकऱ्यांच्या नावांची, खात्यांची अाणि कर्जांची पडताळणी केल्यानंतर मध्यवर्ती बॅंकेने दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केली. बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंत अकोला व वाशीम जिल्ह्यातील मिळून सुमारे २० हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांची खाती कर्जमुक्त झाली अाहेत. ही प्रक्रिया अविरत सुरू राहणार असून, अंतिम गोषवारा तयार व्हायला वेळ लागणार अाहे.
 
एकीकडे जिल्हा बँकेचे खातेदार कर्जमुक्त होत असताना दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँकांच्या खातेदारांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जात अाहे. एवढ्याच संख्येत खातेदार कर्जमुक्त झाले अाहेत; परंतु यासंदर्भातील अाकडेवारी अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. कर्जमाफीसाठी जवळपास १०० कोटींचा अाकडा पोचला आहे.
 
शासनाने घोषित केलेली कर्जमाफीची मुदत २५ नोव्हेंबरला संपली. या मुद्यावरून विरोधक पुन्हा एकदा सरकारवर टीका करत अाहेत; मात्र दुसरीकडे सरकारने यंत्रणांना कामाला लावले असून, खाती कर्जमुक्त केली जात अाहेत. क्षणाक्षणाला ही अाकडेवारी व कर्जमाफीची रक्कम बदलत अाहे.
 
राज्यात बुलडाणा जिल्ह्याला सर्वाधिक कर्जमाफीचा लाभ मिळाला, असे अाधीच जाहीर झालेले अाहे. कर्जमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या संदर्भात प्रशासनाशी संपर्क साधला असता कुठलीही माहिती देऊ नका, असे स्पष्ट अादेश असल्याचे सांगत अाकडेवारी देण्यास नकार देण्यात अाला. जिल्ह्याचे काम अत्यंत चांगले असल्याचे मात्र अधिकाऱ्याने सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...