साताऱ्यात छावण्यांत २० हजार जनावरे

साताऱ्यात छावण्यांत २० हजार जनावरे
साताऱ्यात छावण्यांत २० हजार जनावरे

सातारा : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. वीस शासकीय चारा छावण्या सुरू आहेत. त्यामध्ये २० हजार जनावरे दाखल झाली आहेत. तसेच ११ तालुक्‍यांतील २०७ गावे व ८६१ वाड्यावस्त्यांना २३७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. रोजगार हमी योजनेची ३८५ कामे सुरू असून, दोन हजार ३९८ मजूर काम करीत आहेत. टॅंकर आणि रोहयो कामांची आणखी मागणी दुष्काळी माण, खटाव तालुक्‍यांतून होत असल्याची गंभीर स्थिती आहे.

थकीत वीजबिलांमुळे बंद असलेल्या नळ पाणीयोजना पूर्ववत करण्यासाठी १.७८ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण तालुक्‍यांत दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र आचारसंहितेचे कारण सांगून जिल्हा प्रशासन मात्र उपाययोजनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माण, खटावच्या दुष्काळी भागाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. जिल्ह्यातील ११ पैकी माण, कोरेगाव, फलटण या तीन तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्‍यांतील २०७ गावे व ८६१ वाड्यावस्त्यांना २३७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये माण १०६, खटाव ४१, कोरेगाव ३३, फलटण २८, जावळी ११, वाई सहा, महाबळेश्वर तीन, पाटण दोन, कऱ्हाड दोन, खंडाळा दोन आणि साताऱ्यात तीन टॅंकर आहेत. 

पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी जिल्ह्यात आजअखेर ३४ विंधन विहिरी, सात नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती करून, तर चार पाणीपुरवठा योजना तात्पुरत्या कार्यान्वित केल्या आहेत. १११ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर लोकांच्या हाताला काम देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३८५ कामे सुरू आहेत. त्यावर दोन हजार ३९८ मजूर उपस्थित आहेत. १५ हजार ३७९ कामे शेल्फवर आहेत. आणखी कामे सुरू करण्याची मागणीही विविध गावांतून होत आहे. 

१.७८ कोटींच्या निधीतून योजनांचे वीजबिल भरून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चारा छावण्यांत मोठी जनावरे १६ हजार ९८४, लहान जनावरे तीन हजार १६५ अशी एकूण २० हजार १४९ जनावरे दाखल झाली आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com