गारपीटग्रस्तांसाठी दोनशे कोटींच्या मदतीचा प्रस्ताव

गारपीटग्रस्तांसाठी दोनशे कोटींच्या मदतीचा प्रस्ताव
गारपीटग्रस्तांसाठी दोनशे कोटींच्या मदतीचा प्रस्ताव

मुंबई : चार दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या गारपीटीनंतर आपतग्रस्तांच्या मदतीसाठी दोनशे कोटी रुपयांच्या मदत मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी (ता. १४) दिली. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. कृषिमंत्री फुंडकर पुढे म्हणाले, की अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारकडे आला आहे. या चारही दिवसांत मराठवाडा, विदर्भातील सुमारे दोन लाख हेक्टरवरील क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे अठराशे गावे यात बाधित झाली आहेत. राज्य सरकारने तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महसूल, कृषी विभागाने बहुतांश पंचनामेही पूर्ण केले आहेत. येत्या दोन दिवसांत शिल्लक पिकांचे पंचनामेही पूर्ण होतील. त्यानुसार शेतीपिकांच्या नुकसानीपोटी केंद्र सरकारला सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या मदत मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.  ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा काढला असेल त्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाईल. त्यानुसार मोसंबी व संत्रा पिकासाठी हेक्टरी २३ हजार ३०० रुपये, आंब्याला ३६ हजार ७०० रुपये, लिंबू २० हजार रुपये अशी मदत दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नसेल त्यांना एनडीआरएफच्या निकषांनुसार फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये, बागायतीसाठी १३ हजार ५०० रुपये आणि कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ६ हजार ५०० रुपये मदत दिली जाणार असल्याचे फुंडकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पंचनामे झाले नसल्याचा विरोधकांचा आरोप फुंडकर यांनी फेटाळून लावला. तसेच सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे व्यवस्थित केले जातील, असा दावाही त्यांनी केला.  जिल्हानिहाय नुकसान  बीड - १०,६३२ हेक्टर, जालना - ३२,०००, परभणी - ३,५९५, उस्मानाबाद - ५८३, हिंगोली - १४३, लातूर - २,६७९, जळगाव - २,४९५, बुलडाणा - ३२,७००, अमरावती - २६,५९८, अकोला - ४,३६०, वाशिम - ८,५०९, गोंदिया - ५४, वर्धा - ५६८, नागपूर - २१०, भंडारा - २०, गडचिरोली - १,२७,३२ हेक्टर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com