agriculture news in Marathi, In 2019 Modi Government will be in center says Amit Shah | Agrowon

२०१९ मध्येही मोदी सरकारच : अमित शहा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 एप्रिल 2018

मुंबई : २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात स्थापन होणार असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी (ता. ६) केला. तसेच, मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांच्या हिताचाच कारभार करीत असून, सरकार शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देणार असल्याचे आश्‍वासन शहा यांनी दिले. 

मुंबई : २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात स्थापन होणार असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी (ता. ६) केला. तसेच, मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांच्या हिताचाच कारभार करीत असून, सरकार शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देणार असल्याचे आश्‍वासन शहा यांनी दिले. 

भाजपच्या ३८व्या स्थापनादिनी मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते. शहा यांनी या वेळी भाजपची वाटचाल आणि केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. शहा म्हणाले, ‘‘महापूर आला की सगळी खुरटी झाडे, झुडपे मोडून पडतात, केवळ वटवृक्ष राहतो. मग पुराला घाबरलेले सगळे साप, मुंगूस, कुत्री, मांजरी त्या वृक्षाचा आसरा घेतात. त्याचप्रमाणे सध्या सगळे विरोधक आता मोदी नावाच्या महापुरापासून वाचण्यासाठी एकत्र आले आहेत.’’ 

तसेच, ‘मोदी सरकारने एससी, एसटी अॅक्ट हटवल्याचा अपप्रचार केला जात आहे; पण असे काहीही होणार नाही. मोदी सरकार आरक्षणाला हात लावणार नाही आणि कोणाला लावूही देणार नाही,’ असे शहा यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रात सिंचनासाठी १ लाख कोटी 
भाजपने कधीच धर्म, जातीचे राजकारण केले नाही असे सांगत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की काही लोक महाराष्ट्रावर राज्य करणे आपला अधिकार समजत होते, ते आता निराश झाले आहेत. जे प्रकल्प बंद पडलेत ते एका वर्षात पूर्ण करणार असून, महाराष्ट्रातील सिंचनासाठी १ लाख कोटी रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले.

पवार साहेब चहावाल्याच्या नादी लागू नका 
महाराष्ट्र सरकार चहावर किती पैसा खर्च करते यावर शरद पवारांनी केलेल्या टीकेचा उल्लेख करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, की तुम्ही उगाच चहावाल्यांच्या नादी लागू नका. जरा २०१४ आठवा की चहावाल्यांनी तुमची काय हालत केली. 

मुंडे समर्थकांची नाराजी 
मुंबईतील भाजपच्या स्थापना मेळाव्यातच महाराष्ट्र भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. स्थापना मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे एकही पोस्टर नसल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले व त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काही कार्यकर्त्यांनी खुर्च्या उचलून आपला संताप व्यक्त केला. अखेर कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना पुढे यावे लागले. त्यांनी व्यासपीठावर येऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...