agriculture news in Marathi, 21 percent water storage in reservoirs, Maharashtra | Agrowon

देशातील जलाशयांमध्ये २१ टक्के पाणीसाठा
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

नवी दिल्ली ः उन्हाचा चटका वाढतानाच देशभरात ठिकठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. जलाशयांतील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या देशातील ९१ मोठ्या जलाशयांत ३३.५६३ अब्ज घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण जिवंत पाणीसाठा क्षमतेच्या केवळ २१ टक्के साठा शिल्लक आहे. मात्र, सध्या असलेला पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. मागील वर्षी २९.५२५ अब्ज घनमीटर पाणीसाठा होता. या काळातील मागील दहा वर्षांतील पाणीसाठ्याची सरासरी ३२.२७० अब्ज घनमीटर आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली.

नवी दिल्ली ः उन्हाचा चटका वाढतानाच देशभरात ठिकठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. जलाशयांतील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या देशातील ९१ मोठ्या जलाशयांत ३३.५६३ अब्ज घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण जिवंत पाणीसाठा क्षमतेच्या केवळ २१ टक्के साठा शिल्लक आहे. मात्र, सध्या असलेला पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. मागील वर्षी २९.५२५ अब्ज घनमीटर पाणीसाठा होता. या काळातील मागील दहा वर्षांतील पाणीसाठ्याची सरासरी ३२.२७० अब्ज घनमीटर आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली.

उत्तर विभागात ४४ टक्के पाणी
उत्तर विभागात हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा समावेश होतो. या विभागातील जलाशयांमध्ये सध्या ७.९३ अब्ज घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. जिवंत साठ्याच्या एकूण क्षमतेच्या ४४ टक्के पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात विभागात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. सध्या मागील वर्षाच्या तुलनेत २९ टक्के अधिक पाणी शिल्लक आहे.

पूर्व विभागात २८ टक्के साठा
पूर्व विभागात झारखंड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि त्रिपुरा राज्यांचा समावेश होतो. या विभागातील १५ जलाशयांमध्ये ४.५६ अब्ज घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. या जलाशयांच्या एकूण जिवंत पाणीसाठा क्षमतेच्या २४ टक्के साठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात २८ टक्के पाणीसाठा होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ टक्के कमी साठा आहे. विभागाची याच काळातील मागील दहा वर्षांतील सरासरी २२ टक्के आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणासाठा आहे, तर दहा वर्षांतील सरासरी पाणीसाठ्याच्या तुलनेत अधिक साठा आहे.

पश्‍चिम विभागात केवळ १२ टक्के पाणी 
पश्‍चिम विभागातील जलाशयांमध्ये सध्या केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पश्‍चिम विभागात गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा समावेश होतो. विभागातील २७ जलाशयांमध्ये सध्या केवळ ३.७५ अब्ज घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील दोन्ही राज्यांत दुष्काळ असल्याने भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मागील वर्षी याच काळात १६ टक्के पाणीसाठा होता. मागाल दहा वर्षांतील विभागातील पाण्यासाठ्याची सरासरी २१ टक्के आहे. सध्या या विभागात गेल्या वर्षीच्या आणि मागील दहा वर्षांच्या सरासरी साठ्यापेक्षाही कमी पाणी शिल्लक आहे.   

दक्षिण विभागातही स्थिती बिकट   
देशातील दक्षिण विभागात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांज्यांतील ३१ जलाशयांमध्ये सध्या केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिवंत पाणीसाठा ६.३८ अब्ज घनमीटरवर आला असून, येणाऱ्या काळात तीव्र टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. दक्षिण विभागात मागील वर्षी याच काळात १२ टक्के म्हणजेच यंदा आहे तेवढाच साठा शिल्लक होता. मागील दहा वर्षांची सरासरी १५ टक्के असून, यंदा ३ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे.

मध्य भारतातील धरणेही तळाशी  
मध्य भारतातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतील जलाशयांमध्ये १०.९६ अब्ज घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. क्षमतेच्या केवळ २६ टक्के पाणी उपलब्ध असून, जिवंत पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. मागील वर्षी याच काळात जलाशयांमध्ये २४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर, विभागाची गेल्या दहा वर्षांची पाणीसाठ्याची सरासरी २२ टक्के आहे. 

इतर अॅग्रो विशेष
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...
मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटीपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप...
पीकेव्ही २ बीटी वाणामुळे कापूस...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे...
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मिळणार...चिपळूण, जि. रत्नागिरी ः अलिबागच्या पांढऱ्या...
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...