औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांना औजारांसाठी २२ कोटींचे अनुदानवाटप

औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांना औजारांसाठी २२ कोटींचे अनुदानवाटप
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांना औजारांसाठी २२ कोटींचे अनुदानवाटप

औरंगाबाद : कृषी विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०१८-१९ मध्ये औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील ३०१२ औजारांना २२ कोटी १ लाख रुपयांचे अनुदानवाटप करण्यात आले. 

औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात नुकतीच विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक झाली. औरंगाबाद विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे तीन जिल्ह्यांत २०१८-१९ मधील कृषी विभागाच्या कार्याविषयी सादरीकरण करण्यात आले. त्यातून ही माहिती समोर आली.  

जवळपास २६ प्रकारांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदानाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये ९४० ट्रॅक्‍टर, १९ मिनी ट्रॅक्‍टर, १३० पॉवर टिलर, ११२६ रोटावेटर, ६१ कल्टिवेटर, ११९ सर्व प्रकारचे प्लांटर, २१६ मळणी यंत्र, १ पॅकिंग मशिन, ३८ पॉवर विडर, ५ रिपर व रिपर कम बाइंडर, ४ पाचटकुट्टी, ९ स्प्रेअर ब्लोअर, ३७ कापूस श्रोडर, ७ ऊस पाचट कुट्टी, ९५ पेरणी यंत्र, २१ मिस्ट ब्लोअर, ४० पल्टी नांगर, २७ सब सॉइलर, ४६ डाळ मिल व पूरक यंत्र, ७ ब्रश कटर, ३५ मिनी डाळ मिल, १३ ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्र, ४ मनुष्यचलित औजारे, ८ चाफ कटर, २ स्प्रे ब्लोअर व २ औजारे बॅंकांसाठी अनुदान देण्यात आले.

प्रत्येक घटकासाठी निर्धारित केलेल्या अनुदानानुसार जवळपास २२ कोटी १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. 

सिंचन योजनेअंतर्गत ७२ कोटींवर अनुदानवाटप

तीन जिल्ह्यांत ३३ शेडनेट व ७ पॉलिहाउसचे काम पूर्ण झाले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ७२ कोटी ५५ लाखांचे अनुदानवाटप झाले. तीन जिल्ह्यात १३२७ सामूहिक शेततळी झाली. मागेल त्याला शेततळे योजनेत उद्दिष्टाच्या पुढे काम झाले. सामूहिक शेततळ्यात ४४४२ टीसीएम पाणी साठणार आहे. दुष्काळी परिस्थितीत प्रस्तावित १०५७९ पैकी ५६६० कामे पूर्ण झाली. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत मागेल त्याला शेततळे योजनेतून २९२७१ शेततळी पूर्ण झाली. औरंगाबाद कृषी विभागात २०१८-१९ मध्ये या योजनेअंतर्गत २१ हजार ६०० कामे प्रस्तावित होती. या सोबतच ६८५ कामे सुरू आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com