agriculture news in marathi, 22 farmers Participation of Washim in Masala crop Workshop | Agrowon

मसाला पीक कार्यशाळेत वाशीमच्या २२ शेतकऱ्यांचा सहभाग
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जानेवारी 2018

अकोला : स्पायसेस बोर्ड आॅफ इंडिया (कोची)अंतर्गत नवी मुंबईतील वाशीस्थित सिडको कनव्हेन्शन सेंटरमध्ये मसाला पिकातील उत्पादक, खरेदीदार, विक्रेते, प्रक्रियाधारक तसेच निर्यातदार यांचे एकदिवसीय संमेलन झाले. यामध्ये वाशीम जिल्ह्यातील २२ हळद व इतर मसाला पीक उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे उद्‌घाटक म्हणून स्पायसेट बोर्ड अाॅफ इंडियाचे अध्यक्ष डाॅ. ए. जयतिलक उपस्थित होते.

अकोला : स्पायसेस बोर्ड आॅफ इंडिया (कोची)अंतर्गत नवी मुंबईतील वाशीस्थित सिडको कनव्हेन्शन सेंटरमध्ये मसाला पिकातील उत्पादक, खरेदीदार, विक्रेते, प्रक्रियाधारक तसेच निर्यातदार यांचे एकदिवसीय संमेलन झाले. यामध्ये वाशीम जिल्ह्यातील २२ हळद व इतर मसाला पीक उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे उद्‌घाटक म्हणून स्पायसेट बोर्ड अाॅफ इंडियाचे अध्यक्ष डाॅ. ए. जयतिलक उपस्थित होते.

देशाच्या विविध भागांतून आलेल्या मसाला पीक उत्पादक, विक्रेते, खरीददार, प्रक्रियाधारक तसेच निर्यातदार यांनी आपला संपूर्ण परिचय करून देताना हळद, अद्रक, मिरची, काळेमिरे या व इतर मसाला पिकात देशात अाणि परदेशांत असणारी मागणी, मसाला पिकातील मूल्यवर्धित पदार्थ व त्याबाबत खरेदी विक्रीच्या संधी यावर प्रकाश टाकला.

या कार्यशाळेत करडा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कार्यक्रम समन्वयक डॉ. अार. एल काळे यांच्या मार्गदर्शनात कीटकशास्त्रज्ञ आर. एस. डवरे यांनी प्रतिनिधित्व केले. वाशीम जिल्ह्यातील हळद या महत्त्वाच्या मसाला पिकासंदर्भातील मूल्यवर्धन व निर्यातीच्या संधी तसेच मसाला पीक बाजारपेठ व्यवस्थापनासंदर्भात कृषी विज्ञान केंद्राची तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका यावर संवाद साधला.

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने पवन बेलोकार व विठ्ठल खैरे या हळद उत्पादक शेतकऱ्यांनी विविध खरेदीदार व निर्यातदार यांच्याशी चर्चा केली. या कार्यशाळेत वाशीम जिल्ह्यातील वनोजा, शेलुखडसे, कोयाळी, लिंगा, पवारवाडी, मोरगव्हाण, आसोला या इतर गावांतील २२ हळद उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...